Chandwad

चांदवडचा खोकड तलाव फुल भरल्याने नागरिकांमध्ये समाधान

चांदवडचा खोकड तलाव फुल भरल्याने नागरिकांमध्ये समाधान

चांदवड उदय वायकोले

चांदवड शहरापासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 3 जवळ असलेला खोकड तलाव कालपासून फुल भरून उर्वरित पाणी लेंडी नदीद्वारे वाहत असल्याने चांदवड च्या नागरिकांमध्ये समाधान निर्माण झाले आहे.2019 सालच्या जुलै महिन्यापर्यंत तीव्र पाणीटंचाई शहरात जाणवली होती त्यावेळी खोकड तलावाचे पाणी जवळपास आटले होते.त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पाऊस झाल्याने ज्या प्रकारे खोकड तलाव भरून पाणी ओव्हरफलो झाले होते तसेच काहीसे चित्र आज पहावयास मिळत आहे.17 सप्टेंबर 20202 रोजी झालेल्या तुफान पावसामुळे डोंगर दर्यातील पाणी तलावात येऊन आज सांड पडल्याचे समजताच अनेकांनी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर आनंदाने शेअर केले आहेत. सदर तलाव अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील असून तलावात पाणी भरपूर असल्यास शहरातील कूपनलिकांचे पाणी आटत नसल्याचे भाजपा व्यापारी आघाडीचे नेते महेश खंदारे,शेतकरी संतोष राऊत यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button