Amalner

Amalner: खा शि निवडणूक.. एकूण 65% मतदान…निकालात असेल त्रिशंकु अवस्था..! कमी मतदान..का..?

Amalner: खा शि निवडणूक.. एकूण 65% मतदान…निकालात असेल त्रिशंकु अवस्था..! कमी मतदान..का..?

अमळनेर आज अत्यन्त बहुचर्चित अर्थपूर्ण खा शि ची निवडणूक प्रक्रिया पार पडली. आज एकूण मतदानापैकी 65% मतदान झाले असून निकाल जो पर्यंत धर्मदाय आयुक्तांकडील सुनावणी होत नाही तोपर्यंत जाहीर केला जाणार नाही. सध्यातरी एकूण झालेल्या मतदानावरून आणि गावातील एकूण वातावरणावरून कोणत्याही एका पॅनलला बहुमत मिळणे अशक्य आहे. यामुळे त्रिशंकु अवस्था असण्याची दाट शक्यता आहे.एकूणच गेल्या तीन वर्षात झालेले वाद,डॉ ज्योती राणे डॉ बी एस पाटील यांचे राजीनाने,बदललेली परिस्थिती, कोरोना ,कोर्ट मॅटर इ कारणांमुळे आजचे मतदान विशेष लक्षवेधी होते.परंतु एकूणच 35% लोकांनी ह्या प्रक्रिये कडे पाठ फिरवली आहे.अर्थातच “अर्थकारण” असूनही सुज्ञ लोकांनी मतदान केले नाही की इतर कारणांमुळे मतदान कमी झालं हा संशोधनाचा विषय आहे. पण ह्या न झालेल्या मतदानाचा नेमका फायदा तोटा कोणाला होतो हे सांगणे आता तसे कठीणच आहे.पण निश्चितच नक्कीच याचे दूरगामी परिणाम खा शि वर होणार आहेत हे मात्र नक्की..

दरम्यान दुपारी प्रताप महाविद्यालय रस्त्यावर ट्राफिक जाम झाली होती तर अनेक ठिकाणी “अर्थपूर्ण जेवणावळी” सुरू असल्याची देखील चर्चा होती.कोरोना चे सर्व नियम धाब्यावर बसवून निवडणूक पार पडली. कोणीही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन केले नाही.

ट्राफिक जाम..

अर्थपूर्ण जेवणावळी..

मास्क वापर,सोशल डिस्टनगसिंग चा फज्जा..

पोलीस प्रशासन वगळता प्रशासन अनुपस्थित..

वाटप केंद्रे बदलले..

3 वाजेनंतर मतदानाला वेग..

इ घटना घडल्या आहेत. उमेदवार, मतदार आणि उमेदवारांचे नातेवाईक सर्वांनीच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवलीचे चित्र स्पष्ट पणे दिसत होते. असो सध्या तरी निवडणुकी चा एक टप्पा पार पडला असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.आज एकमेकांच्या विरोधात प्रचार करून उणे दुणे काढणारे एकाच टेबलवर बसून अर्थपूर्ण खा शि चालवणार आहेत एव्हढं मात्र नागरिकांनी, सदस्यांनी, फेलोनीं, आणि पत्रकारांनी लक्षात असू द्यावे म्हणजे झाले ..

Amalner: खा शि निवडणूक.. एकूण 65% मतदान...निकालात असेल त्रिशंकु अवस्था..! कमी मतदान..का..?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button