Maharashtra

किल्लारी येथे अँटी कोरोना फोर्स पथकाची स्थापना

किल्लारी येथे अँटी कोरोना फोर्स पथकाची स्थापना

प्रतिनिधी प्रशांत नेटके

लातुर जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून विविध प्रकारचे आदेश देण्यात आलेले असून पोलीस विभाग त्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे.

देशासह सर्व जगभरात कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झालेले असून या पासून बचाव व्हावा म्हणून शासन स्तरावर अतोनात प्रयत्न केले जात आहे. या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणूनच २१ दिवसाचे लॉक डाऊन केल्यानंतर ही कोरोना आटोक्यात येतं नाही म्हणून लातुर
जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून सूचना प्राप्त होताच दि १७ एप्रिल रोजी औसा तालुक्यातील किल्लारी ग्रामपंचायत च्या वतीने अँटी कोरोना फोर्स ची स्थापना करण्यात आली. तसेच किल्लारी येथे मुख्य रस्त्यावर पाच ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले. प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावे , सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये यासाठी किल्लारी ग्रामपंचायत च्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येत असून काही नागरिक अजूनही मास्क न लावता घरा बाहेर पडताना दिसतात. अशा मास्क न वापरणाऱ्या नागरिकाकडून ५० रु प्रमाणे ग्रामपंचायत मार्फत दंड वसूल करण्यात येत आहे. यावेळी ग्रामसेवक एस डी सूर्यवंशी,पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य युवराज गायकवाड, पत्रकार किशोर जाधव, आबासाहेब इंगळे, माजी जि प सदस्य दिलीप लोहार , ग्रामपंचायत सदस्य पप्पू बालकुंदे , गोविंद भोसले, किशोर भोसले आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button