Amalner

Amalner: कराटे ट्रेनर मास्टर करंदीकर यांच्या 36 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर मिळवले सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक

Amalner: कराटे ट्रेनर मास्टर करंदीकर यांच्या 36 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर मिळवले सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक

अमळनेर पॉवर ऑफ मार्शल आर्ट्स, मनमाड आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक कराटे स्पर्धेत अमळनेर येथील मास्टर करंदीकर यांच्या 36 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, रौप्यपदक व कास्यपदक जिंकून प्रथम येण्याचा मान मिळविला.
सामजिक कार्यकर्ते गिडगे ताई, शिवसेना नाशिक जिल्हाध्येक्ष सुनील भाऊ हाडगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर व मुंबई येथील 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात अमळनेर येथील मास्टर करंदीकर यांच्या 36 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, रौप्यपदक व कास्यपदक जिंकली. म्हणून अमळनेर शहराला प्रथम क्रमांकाचा सन्मान देण्यात आला. तर मालेगांवला दुसरा क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत सुवर्णपदक, रौप्य पदक व कास्यपदक पटकाविलेले खेळाडू..

अतुल रामदास सुरळकर, अर्नव दिपक सोनवणे, कार्तिक विनोद पाटील, हरीष संदीप
सोनवणे, वेदांत भुपेंद्र वानखेडे, अनिकेत बबन पाटील, निशांत विनोद पाटील, वैश्र धनजय चव्हाण, सार्थक नितिन पाटील, लोकश भुषण भामरे, सुदर्शन अशोक कोळी,समर्तक देवेंद्र देशमुख, ईशान्त मच्छींद्र पाटील, प्रतिक दिनेश मोराणकर, पृवेश दिनेश मोरांकर, तन्मय कैलास साळुंखे, मानस कैलास साळुंखे, मल्हार गणेश खरोटे, कृष्णा केतन गोसावी, दिक्षांत प्रकाश मेश्राम, सिद्धेश शाम पाटील, तेजस पंकज पाचपुते, दुर्गश नाना पाटील, गितार्थ महेश पाटील, देवेंद्र नितिन पाटील, दक्ष प्रदीप पाटील, देवांश अनिल बोरसे, पिहल सचिन पाटील, दिव्यानी पवार, सुकेशनी समाधान सपकाळे, आरोही मिलिंद पाटील, आर्या राजेंद्र देशमुख, रोशणी नरेश सुर्यवंशी, नक्षत्रा अमोल दुसाने यांनी पदके पटकावली आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शहरात अभिनंदन होत आहे.तर मास्टर सुनील करंदीकर यांचे देखील कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button