Amalner

Amalner,: प्रतापच्या राज्यशास्त्र विभागाची “प्रेरणा” उत्कृष्ट युवा संसदपटू म्हणून कार्यशाळेत सन्मानित…

Amalner,: प्रतापच्या राज्यशास्त्र विभागाची “प्रेरणा” उत्कृष्ट युवा संसदपटू म्हणून कार्यशाळेत सन्मानित…

अमळनेर क. ब. चौ. उ. म. वि, जळगाव आणि य.ना.चव्हाण कॉलेज,चाळीसगाव विद्यार्थी विकास अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त युवा संसद कार्यशाळा व स्पर्धा दिनांक ०५ मे २०२२ ते ०७ मे २०२२ दरम्यान घेण्यात आले. यात प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाची शुभांगी पाटील, ऋषिकेश पाटील, प्रेरणा चौधरी, रेणुका रायसिंग, डॉ.राखी घरटे (संघ व्यवस्थापक) यांनी सहभाग घेतला होता.
प्रस्तुत कार्यशाळेत प्रेरणा दिनकर चौधरी या विद्यार्थ्यीनीने विरोधी पक्षनेते म्हणून सक्रिय भूमिका पार पाडली, उपयुक्त व समाजाभिमुख प्रश्न उपस्थित करुन नेतृत्वाची चमक दाखविली. तिच्या या सक्रियतेमुळे परीक्षकांनी उत्कृष्ट युवा संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तिच्या या यशा मुळे खा.शि.मंडळ कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, चिटणीस डॉ ए बी जैन, प्राचार्य डॉ पी आर शिरोडे, डॉ.एम.एस.वाघ, डॉ जयेश गुजराथी, प्रा.जे.बी.जैन, डॉ.डी.एन.वाघ, डॉ जे बी पटवर्धन, डॉ कल्पना पाटील, डॉ विजय तुंटे, डॉ हर्षवर्धन जाधव, डॉ कुबेर कुमावत, डॉ एस बी नेरकर, डॉ.धिरज वैष्णव, डॉ.नलिनी पाटील, डॉ.तुषार रजाळे, क्रीडा संचालक सचिन पाटील, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.रमेश माने, प्रा.वृषाली वाकडे, प्रा.सुनिल राजपूत, प्रा कैलाश निळे, प्रा.आर सी सरवदे, डॉ बाळसकर, प्रा.भुसनर, प्रा.नितिन पाटील, श्री.योगेश बोरसे आदिनी अभिनंदन व कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button