Amalner

Amalner: गरुड झेप… कंजरभाट समाजातील सर्व सामान्य कुटुंबातील डॉ निलेश माछरे रशियातून डॉ पदवी प्राप्त

Amalner: गरुड झेप… कंजरभाट समाजातील सर्व सामान्य कुटुंबातील डॉ निलेश माछरे रशियातून डॉ पदवी प्राप्त

अमळनेर येथील कंजर भाट समाजातील सर्वसामान्य कुटुंबातून डॉक्टर नितेश मांछरे M..B.B.S ची पदवी रशिया येथे state medical academy रशिया विद्यापीठ येथे मिळवली.

गरुड झेप
आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अतिशय जिद्दी व चिकाटीने आपले व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले लहानपणापासूनच आई-वडिलांच्या स्वप्न होतं मुलाला डॉक्टर बनवायचं होत.

नर्सरी पासून तर बारावीपर्यंत शरद पवार इंटरनॅशनल स्कूल कळवण येथे डॉक्टर नितेश माछरे यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जिद्द व चिकाटीने कंजर भाट समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला, व या समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे अमळनेर हे संतांची भूमी आहे या भूमीतून या समाजातील हा दुसरा M.B.B.S डॉक्टर झालेला आहे.

रशिया krygyz state medical academy या विद्यापीठात आपली एमबीबीएस ची डिग्री डॉक्टर नितेश माछरे यांनी प्राप्त केली.
एकीकडे समाजातील लोकांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे आजही समाजातील काही कुटुंबाची ही परिस्थिती आहे पण त्या परिस्थितीलाही न घाबरता आपल्या मेहनतीच्या बळावर राजेश माछरे यांनी दिवस रात्र एक करून आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि आज त्यांच्या स्वप्नांना खरोखर रंग मिळाले. त्यांच्या वडिलांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे सहा वर्ष रशिया येथे आपल्या फॅमिली पासून दूर राहून तो यश मिळविले.
दिनाक आज रोजी 22/06/2023 डॉक्टर नितेश माछरे हे घरी परतले व कंजर समाजातील मुलं हे जीनियस असतात हे लोकांना दाखवून दिले. कोरोना काळात डॉक्टर अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक वर्ष प्रॅक्टिस देखील केली. रुग्णांना धीर देण्याचा देखील काम केलं.

कंजरभाट समाज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्था मार्फत त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. खरोखर कंजर भाट समाजासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button