Jalgaon

केंद्र शासनाच्या गायी व म्हैस खरेदी योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -भैरवी वाघ-पलांडे

केंद्र शासनाच्या गायी व म्हैस खरेदी योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -भैरवी वाघ-पलांडे

नूरखान

अमळनेर-तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाया सारखा जोडधंदा सुरु करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ह्या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दूध संघ संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांनी केले आहे .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतिसाठी दुग्ध व्यवसाय ह्या जोडधंदा सुरु करण्याच्या उद्देशाने संकरित गायी खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.ही योजना नाशिक विभागातील 30 सहकारी दूध संघाच्या माध्यमातून राबविन्यात येणार असून तालुक्यात ही योजना जळगांव जिल्हा सहकारी दूध संघाच्या माध्यमातून राबविन्यात येणार आहे.पंतप्रधान किसान योजना ह्या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड चे वाटप करण्यात आले आहे.त्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा तत्काळ लाभ मिळणार आहे.शिवाय जे शेतकरी सहकारी दुध उत्पादक सोसायटी ला दूध पुरवठा करीत असतील त्यांनी सोसायटी चे सभासद असल्याचे प्रमाणपत्र ह्या योजनेच्या लाभासाठी सादर करणे बंधनकारक आहे.ही योजना सर्व सहकारी व राष्ट्रीयकृत बँका मध्ये लागू करण्यात आल्याचे भैरवी वाघ-पलांडे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button