Amalner

Amalner:शेतकी संघात भरड धान्य विक्री केली पण शेतकरी पैश्यांपासून वंचित..!

Amalner:शेतकी संघात भरड धान्य विक्री केली पण शेतकरी पैश्यांपासून वंचित..!

अमळनेर जिल्हा बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्यानी शेतकी संघात भरड धान्य विक्री केली होती परंतु अद्याप त्यांना पैसे मिळाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.नवीन पेमेंट प्रणालीला जिल्हा बँक लिंक होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

केंद्र सरकारच्या पीएफएमएस या प्रणाली द्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. इतर राष्ट्रीयकृत बँका या प्रणालीला आधीच लिंक असल्याने इतर बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळाले आहेत. परंतु जिल्हा बँक अजून लिंक नसल्याने तालुक्यातील १४६ शेतकऱ्यांचे पैसे यामुळे अडकले आहेत.सर्व शेतकरी मिळून एकूण रक्कम ८४ लक्ष ५४ हजार रुपये इतकी आहे.जवळपास 3 ते 4 महिने उलटूनही जिल्हा बँक या पब्लिक फंड मॉनिटरिंग सिस्टमला लिंक करण्याचे काम सुरू आहे.परंतु याचा शेतकऱ्यांना मनस्ताप होत असून नाराज झाले आहेत. लवकरात लवकर ही प्रणालीला जिल्हा बँक लिंक करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button