India

? Big Breaking.. ठरलं! राजनिकांतची राजकारणात एन्ट्री,31 डिसेंबरला मोठी घोषणा*

? Big Breaking.. ठरलं! राजनिकांतची राजकारणात एन्ट्री,31 डिसेंबरला मोठी घोषणा*

अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. थलैवा म्हणजेच, रजनीकांत निवडणूक लढवणार का? राजकीय जीवनात उतरणार का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. तर जानेवारीत नवीन पक्षाचं लॉन्चिंग केलं जाणार असल्याची माहिती आहे. तमिळनाडू मधील गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
निवडणूक लढण्याचे दिले संकेत

तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांचं राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले होते की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात.

2021 मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही. रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.

गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहेत रजनीकांत

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या अद्याप त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली होती.

रजनीकांत यांच्या राजकीय एन्ट्रीबाबत चर्चा रंगल्यानंतर ट्विटरवर #RajinikanthPoliticalEntry हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.. यापूर्वी रजनीकांत यांनी 2017 साली डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की, तमीळनाडूमध्ये राजकीय पक्षाची स्थापना करणार. पण त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते राजकारणात निश्चित प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.निवडणूक लढण्याचे दिले संकेत दिले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button