Pandharpur

अभिजीत पाटील यांची आर्थिक क्रांती चळवळ सकारात्मक परिवर्तन घडवणारी ठरेल : आमदार शहाजी बापू पाटील

अभिजीत पाटील यांची आर्थिक क्रांती चळवळ सकारात्मक परिवर्तन घडवणारी ठरेल : आमदार शहाजी बापू पाटी

(महूद येथे आमदार शहाजीबापू पा यांच्या हस्ते DVP पिपल्स मल्टीस्टेटचे उदघाटन संपन्न)

प्रतिनिधी
रफिक आतार

महूद पारंपरिक व्यवसाय, शेती उद्योग करत असताना आजच्या युगात बॅक हि महत्त्वाची असल्याने DVP उद्योग समूहाने बॅकींग क्षेत्रात वाटचाल करीत महूद येथे शाखेचे उदघाटन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते अभिजीत आबा पाटील, शिगवणे सरपंच आण्णा महाडिक, अतुल खुपसे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महूद शाखेच्या लोकार्पण सोहळा निमित्त येथील ऊस उत्पादक शेतकरी,नागरिकांचे अर्थिकमान उंचावण्यास तसेच शेतकऱ्यांच्या अर्थकारणात आपली हि संस्था नक्कीच योगदान देईल. यासंस्थेतून ATM, NEFT, RTGS, IMPS, QR कोड, मोबाईल बॅकींग, लाॅकर सुविधा अशा विविध सुविधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. “आम्ही जपतो सर्वकाही” हे आपले ब्रीदवाक्य ही संस्था सार्थ ठरवते आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. सांगोला साखर कारखाना सुरू केल्याने ऊस उत्पादक शेतकरी, व्यावसायिक व उद्योजकांना सक्षम, समृद्ध करण्यासाठी हि बॅक काम करेल असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
आमदार शहाजी पाटील म्हणाले की, DVP मल्टीस्टेटने सांगोला तालुक्यात आर्थिकमान उंचावेल तसेच सांगोला साखर कारखाना सुरू करून येथील उस उत्पादक शेतकऱ्यांची बिले त्यांनी वेळेत दिल्याने शेतकरी बांधव आनंदी आहे. अभिजीत पाटील यांनी सहकारासोबत बॅकींग क्षेत्रात वाटचाल केल्याने अर्थकारणाची क्रांती चळवळ सुरू केली आहे. यातून नवीन उद्योजक निर्माण होऊन देशाचं अर्थकारण मजबूत होईल. महूद भागातील सर्वसामान्यांना उद्योग व्यवसाय, शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य देऊन येथील अर्थकारणाला चालना द्यावी असे म्हणाले.यावेळी उपस्थित सांगोला पंचायत समिती सदस्य सजंय मेटकरी, सांगोला साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन येशूनाना चव्हाण, संचालक शहाजी नलवडे, संचालक तुकाराम जाधव, बाळूकाका पाटील, सूर्यकांत घाडगे, धनाजी पाटील, सरपंच कल्याण लुबाळ, उपसरपंच महादेव येळे, लोटेवाडी सरपंच विजय खांडेकर, महूदचे उपसरपंच दिलीप नागणे, सजंय कारंडे, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक दिपक आदमिले, पळशीचे मा.सरपंच हणमंत पाटील, जनक भोसले, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, पिराची कुरोलीचे सरपंच कुलदीप कौलगे, मल्टीस्टेटचे चेअरमन संदेश दोशी, सुरज पाटील, सीईओ भुतेकर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button