Amalner

Amalner: क्रेटाची बसला धडक.. मद्यधुंद चालक…

Amalner: क्रेटाची बसला धडक.. मद्यधुंद चालक…

अमळनेर एसटी बस आणि चारचाकीचा अपघात झाल्याची घटना तालुक्यातील एकलहरे गावाजवळ घडली. यात चारचाकी चालक हा मद्यधुंद अवस्थेत असतांना त्यास मार लागला असून यासंदर्भात मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक 10 ऑक्टोबर रोजी अमळनेर आगाराची एसटीबस शिरपूरकडे जात असताना सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास भिलाली फाट्याच्या जवळ बेटावदकडून येणाऱ्या क्रेटा वाहन (एमएच १७, बीएम ५९९९) गाडीचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून बसच्या डाव्या बाजूला धडक दिली. क्रेटा चालकाला हातापायाला जबर दुखापत झाली असून बसचालक व प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. बस चालक नितीन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात क्रेटा चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ सचिन निकम करत आहे. जखमी क्रेटा चालक अंकुश घारे हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रहिवासी असून त्याला अमळनेर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button