Amalner

Amalner: खा शि निवडणूक..आणि खा शि त 1981 पासून कली घुसला..!

Amalner: सन 1981 पासून खान्देश शिक्षण मंडळात कलियुगाची सुरूवात
(भाग-1)

  • अत्यन्त उज्वल आणि प्रतिष्ठित परंपरा असलेल्या खा शित खारे वारे वाहू लागले
  • शिक्षणाचा गंध नसलेल्या लोकांच्या ताब्यात खा शि गेली अन डबघाईला लागली
  • खा शि चे खऱ्या अर्थाने वस्त्रहरण सुरू झालं
  • संपूर्ण महाराष्ट्रात नं 1 ला असलेले महाविद्यालय आणि संस्थे ने आपलं स्थान गमावलं..
  • हे आणि बरच काही वाचा..

अमळनेर – संयुक्त खान्देशातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे खान्देश शिक्षण मंडळात 1981 च्या निवडणूकीनंतर कलियुगाची सुरूवात झाली आणि राजकारणाचे रामायण-महाभारत सुरू झाले. सुमारे 75 वर्ष खान्देश शिक्षण मंडळ हे सरस्वतीचे पवित्र मंदिर समजले जात होते. या मंदिराचे पावित्र्य श्रीमंत प्रतापशेठजी, दानशूर भांडारकर कुटुंब आणि रावसाहेब बंगाली यांनी जपले होते. परंतु कालाय तस्म नमःह या उक्तीनुसार या सरस्वती मंदिरात अनेक दुर्जनाची दृष्ट लागली आणि हे पवित्र सरस्वतीचे मंदिर महालक्ष्मीचे मंदिर म्हणून ओळखले जावू लागले. सर्वसाधारणत सरस्वती व लक्ष्मी एकाच ठिकाणी नांदत नसते असे म्हणतात. जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती जास्त वेळ थांबत नाही आणि लक्ष्मी असते तिथे सरस्वती नांदत नाही. सन 1981 च्या निवडणूकीमध्ये समाजात ज्यांना प्रतिष्ठा नाही असे लोकं निवडून आले आणि त्या लोकांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करून संस्थेत महाभारत घडविले. हे महाभारत घडवित असतांना जाती धर्माचा आधार घेतला आणि कुटनीतिने संस्था ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षणाचा गंध नसलेले अनेक नॉन मॅट्रीक धनवान लोकं या संस्थेत सभासदांना पैसे वाटून निवडून आले आणि तेथूनच संस्थेच्या कलियुगाची सुरूवात झाली.
या कलियुगातील अनेक नामवंत, शुध्द मनाचे काही संचालकही निवडून आले होते. त्यात प्रामुख्याने सर्वश्री – भगवंतसिंगजी कालरा, दादासाहेब आर. के. पाटील, आप्पासाहेब एस. के. पाटील, श्‍यामदादा मुंदडा, डॉ. बी. आर. बडगुजर, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. किशोर शहा आदिचा समावेश होता. बहुतांशी संचालक हे केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी निव्ाडून येत असत. माल लगावो माल मिलेगा या तत्वानुसारच त्यांनी पुढची कारकिर्द उभी केली. त्यामुळे श्रीमंत प्रतापशेठजी, दानशूर भांडारकर कुटुंब आणि रावसाहेब बंगाली यांच्या आत्म्यास दुःखदायी क्लेष झाले. त्यासोबत संस्थेतील पेट्रन, व्हा.पेट्रन आणि फेलो यांची मान शरमेने खाली गेली. संस्था काबीज करण्याच्या दृष्ट हेतूने जाती-पातीचे संघटन करून चुकीचे पायंडे पाडले गेले. त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक दर्जा खालावला आणि बाहेरगांवचे विद्यार्थी शिकण्यासाठी संस्थेत येणे बंद झाले. अशा रितीने दृष्ट कलिने खान्देश शिक्षण मंडळात कलियुग निर्माण केले. निकोप समाजासाठी घातक असलेले व दृष्ट प्रवृत्तीचे लोकं निवडून आले. त्या लोकांमध्ये दारूवाले, सट्टेवाले, जुगार खेळणारे, पत्ते खेळणारे चारित्र्यहीन आणि स्वतःच्या शिक्षणात नॉन मट्रीक असणारे अनेक महाभागांचा संस्थेत सुळसुळाट झाला.
संस्थेच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही निवडणूकीमध्ये पैसे वाटले जात नसत त्याठिकाणी एकीकडे निवडणूकीत सभासदांना पैशाचे अमिष दाखवायचे आणि दुसरीकडे नोकरभरतीच्या रोजगार हमी योजनेत करोडो रूपयांचा भ्रष्टाचार करायचा. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मार्गाने आलेले शिक्षक, प्राध्यापक कोणत्या गुणवत्तेचे आहेत हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे नोकरभरतीच्या मुलाखतीसाठी येणारे अनेक शिक्षक आणि प्राध्यापक दर्जेदार गुणवत्तेचे असूनही तसेच गोल्ड मेडलिस्ट असूनदेखील त्यांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे गुणवान आणि गोल्ड मेडलिस्ट उमेदवार हे अमळनेर बाहेर गेले. या गोष्टीची भ्रष्टाचारी संच्ाालकांना ना लाज ना खंत होती. फक्त संस्थेच्या रोजगार हमी योजनेमधूनच आपली घरे-दारे चालावी हा दुष्ट हेतू होता.
अमळनेर येथिल सुप्रसिध्द विप्रो कंपनीचे मालक मा. श्री. अझिम प्रेमजी साहेब यांनी प्रताप हायस्कूलच्या टेक्निकल स्कूलला सन 1986 साली 6 लाख रूपयांची देणगी संस्थेस दिली होती. त्याआधी अमळनेर येथील सत्यनारायण ऑईल मिलचे मालक मा.श्री. सुरेशशेठ गुप्ता आणि त्यांच्या बंधूनी संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी 1 लाख रूपयांची देणगी दिली होती. त्यामुळे संस्थेने त्या इंग्लिश मिडीयम स्कूलला कै.पुसालालजी गुप्ता हे नाव दिले. संस्थेच्या पूर्व इतिहास लक्षात घेता ज्या देणग्या संस्थेस मिळाल्या होत्या त्यावेळी कै. पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल विप्रो कंपनीने चालविण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. शिक्षणप्रेमी अझिम प्रेमजी साहेबांनी हे इंग्लिश मिडीयम स्कूल महाराष्ट्रात अग्रस्थानी राहील अशी शाश्‍वती सन 1986 साली संस्था चालकांना दिली होती. परंतु दुर्दैवाने त्यावेळच्या संस्थाचालकांना डबक्याच्या बाहेरील जग माहितच नव्हते. त्यामुळे त्यांनी विप्रोचा प्रस्ताव नाकारला आणि खान्देश शिक्षण मंडळ किमान 25 वर्ष मागे नेले. त्याच विप्रोच्या मालकांनी अझिम प्रेमजी साहेबांनी पुढे भारतातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी सुमारे 50000 कोटी रूपयाची देणगी स्वरूपाची मदत केली. त्यामुळे भारतातील हजारो विद्यार्थ्यांनी गुणवत्तेचे शिक्षण घेवून विप्रो कंपनीला मनापासून धन्यवाद दिले. अशा रितीने नॉन मॅट्रिक झालेल्या संचालकांनी विप्रोचा प्रस्ताव नाकारून संस्थेच्या इतिहासात काळ्या शाईने नोंद केली व अमळनेरातील इंग्लिश मिडियम मधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान केले. अमळनेरकरांचे दुर्दैव असे की, ज्या ज्या वेळेस अमळनेर शहराला विकासाची संधी मिळाली त्या त्या वेळेस अमळनेरातील काही दुष्ट प्रवृत्तीच्या नेत्यांनी चांगले प्रस्ताव नाकारून अमळनेर शहराला अनेक वर्ष मागे घेवून आले. त्यामुळे संस्थेसाठी उच्च शिक्षण घेतलेला संचालकच हवा अशी अमळनेरकरांची इच्छा आहे. 1981 पूर्वी अमळनेर शहराला फार मोठा इतिहास आहे. खान्देश शिक्षण मंडळ हे सरस्वतीचे पवित्र मंदिर म्हणून ओळखले जात होते. तसेच अमळनेरची अर्बन बँक सर्व सामान्य सभासदांची आर्थिक गरज भागविणारी कामधेनू होती. आणि अमळनेर नगरपरिषद अमळनेरकरांच्या गळ्यातील ताईत होता. त्यामुळे अमळनेर शहर हे आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रस्थानी होते. संत सखाराम महाराजांची पावन भूमी, श्रीमंत प्रताप शेठजींची उद्योग आणि शिक्षण भूमी आणि प. पू. साने गुरूजींची कर्मभूमी म्हणून उभ्या महाराष्ट्र अमळनेर शहराकडे पाहत होता. त्यामुळे समस्त अमळनेरकर मोठया अभिमानाने मी अमळनेरचा रहिवासी आहे असे सांगत होते. हा उज्वल इतिहास पुसण्याचे ज्यांनी ज्यांनी महापाप केले आहे. ती मंडळी त्यांच्या कर्माची फळे भोगत आहेत आणि भोगत राहतील. मराठीत एक म्हण आहे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. असा काळ सोकावल्यामुळे अमळनेर शहराची आज दुर्दैशा झाली आहे. या गोष्टीची समस्त अमळनेरकरांना खंत वाटत आहे.
अमळनेरच्ाा इतिहास पाहता ज्यांनी ज्यांनी संत सखाराम महाराज आणि श्रीमंत प्रताप शेठजींचे गैरमार्गाने भ्रष्टाचाररुपी पैसा खाल्लेला आहे. तो आजपर्यंत कोणालाही पचला नाही आणि पचणार नाही. या संदर्भात अमळनेरकरांनी अनेक कुटुंब उध्दवस्त होतांना पाहिलेली आहेत. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी संत सखाराम महाराज आणि श्रीमंत प्रताप शेठजीं यांचा पैसा खाल्ला असेल त्यांनी अजूनही सुधरून जावे आणि आपल्या पापांची शिक्षा भोगून सन्मार्गाला लागावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी होत असून सन्माननीय सभासदांनी योग्य उमेदवारांची निवड करून संस्था वाचवावी आणि श्रीमंत प्रताप शेठजी, प.पू.साने गुरूजी व प.पू. भावे गुरूजी, कै.भिकाजीशेठ भांडारकर आणि बंधू, कै. दोधूशेठ भांडारकर आणि बंधू, कै.रावसाहेब बंगाली यांच्या पवित्र आत्म्यास स्मरून दगडापेक्षा विट मऊ या न्यायाने प्रामाणिकपणे मतदान करावे आणि खान्देश शिक्षण मंडळ वाचवावे ही आमची सभासद बंधूना कळकळीची विनंती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button