shirsoli

शिरसोलीतील रेशन दुकानाची चौकशी करण्याचे दिले आदेश

शिरसोलीतील रेशन दुकानाची चौकशी करण्याचे दिले आदेश

रजनीकांत पाटील

शिरसाेली ::> शिरसोली प्र.न. येथील रेशन दुकान क्रमांक दाेनचे चालक चौधरी शालिग्राम रामदास यांच्या दुकानात माजी सरपंच रामकृष्ण परशुराम काटोले यांनी अचानक भेट दिली हाेती. त्यात माेजमाप केले असता तांदूळ व गव्हाण्या गाेण्यांतील मापात तफावत अाढळून अाली हाेती. काटाेले यांनी याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी या दुकानाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे अादेश दिले अाहेत, अशी माहिती काटाेले यांनी दिली. माजी सरपंच रामकृष्ण काटोले, पंचायत समिती अध्यक्ष नंदलाल पाटील, माजी सरपंच अनिल पाटील आदींनी हा विषय मांडला हाेता.

Leave a Reply

Back to top button