Amalner

Amalner:मांडळ येथे लाकडी दांड्याने मारहाण..

Amalner:मांडळ येथे लाकडी दांड्याने मारहाण..

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे एका व्यक्तीला दगड का मारला असे विचारल्याचा राग आल्याने दोन जणांनी त्या व्यक्तीस लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.याबाबत मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की रामचंद्र आनंदा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.1 फेब्रु रोजी संध्याकाळी 6 वाजता मुकेश रघुनाथ कोळी व राकेश रघुनाथ कोळी यांचे भांडण सुरू असताना रामचंद्र च्या घराकडे दगड मारला.दगड का मारला असे विचारले असता मुकेश व राकेश यांनी दारूच्या नशेत फिर्यादी व त्याची पत्नी यांना लाकडी काठ्यांनी मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.फिर्यादी रामचंद्र ने दिलेल्या माहितीनुसार मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो ना भरत गायकवाड हे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button