Nashik

लोकनेते श्रीराम शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या हभप निवृत्ती महाराज यांचे किर्तन

लोकनेते श्रीराम शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या हभप निवृत्ती महाराज यांचे किर्तन
दिंडोरी-

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तसेच कादवा सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीरामजी शेटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ.प.निवत्ती महाराज इंदोरीकर यांचे किर्तन होणार असल्याची माहीत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर भगरे व अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तौसिफ मनियार यांनी दिली आहे.
श्रीरामजी शेटे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी(७५)व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपत पाटील, संजय पडोळ, विलास कड ,बाळासाहेब जाधव ,अनिल देशमुख, नरेश देशमुख ,डाॅ.योगेश गोसावी ,शाम हिरे, आदी सह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर किर्तन योगराज लॉन्स लखमापुर फाटा येथे दुपारी 3 ते 6 या दरम्यान होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्रीरामजी शेटे सोशल फाऊंडेशन वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button