Maharashtra

?️ कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर “रामायण” दाखविण्या मागे “रामायण”?

“रामायण” दाखविण्या मागे रामायण?

प्रा जयश्री दाभाडे

देशभरात कोव्हिड 19 चा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. लोकांनी बाहेर पडून संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झालाय. याच परिस्थिती त केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदर्शनवर ‘रामायण’ या 80 च्या दशकातल्या मालिकेचं पुनःप्रसारण सुरू करण्याची घोषणा केली.

लोकांच्या आग्रहास्तव शनिवार, 28 मार्चपासून रामायणचं प्रसारण पुन्हा एकदा दूरदर्शन नॅशनल वाहिनीवर सुरू करण्यात आले आहे. पहिला भाग सकाळी 9 वाजता आणि दुसरा भाग रात्री 9 वाजता दाखविण्यात येत आहे.

?? जेंव्हा रामायण सुरू असे

1987 ते 1988 या काळात दूरदर्शनवर रामायण या मालिकेचं प्रसारण सुरू झालं होतं. अरुण गोविल (श्रीराम), दीपिका चिखलिया (सीता), दारा सिंग (हनुमान), सुनील लाहिरी (लक्ष्मण) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या.आणि आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखा अत्यन्त दमदार पद्धतीने रेखाटल्या होत्या.राम म्हणजे अरुण गोविल यांना तर लोक प्रत्यक्ष रामच समजत होते. हीच स्थिती सीता,हनुमान,लक्ष्मण,रावण या पात्रांची होती.

रामायण’ मालिकेचा तत्कालीन राजकारणाशी खूप जवळचा संबंध होता. 80 च्या दशकात देशभरात हिंदुत्वाच्या लाटेला बळ देण्याचं काम या मालिकेने केलं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.

रामायण टीव्हीवर प्रसारित करणं हा भारताच्या धर्मनिरपेक्षितेचा शेवटचा क्षण होता. अत्यन्त धार्मिक आणि रुढीवादी भारतीय त्यातल्या त्यात महिला वर्ग प्रमुख लक्ष्य होत.

भोळसट आणि अंधश्रद्धाळु भारतीय जनतेने या मालिकेला भक्तीभावाचा प्रतिसाद दिला पण त्याचं रुपांतर एका राजकीय शक्तीत करण्यात आलं. यात तत्कालीन राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची होती.

फ्रंटलाइन हे मासिक वाचलं तेंव्हा त्यात 200 मध्ये या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत प्राध्यापक राजगोपाल यांनी म्हटलं होतं की तत्कालीन सरकारने जेव्हा ‘रामायण’चं दूरदर्शनवरून प्रसारण सुरू करणं हा धार्मिक पक्षपात न करण्याच्या अनेक दशकं चाचलेल्या परंपरेला तडा होता. हिंदू राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.”

परिणामी स्वातंत्र्योत्तर काळातली सर्वांत मोठी हिंदुत्व वादी चळवळ सुरू झाली. त्यामुळे भारतिय राजकारणाची दशा आणि दिशा बदलली. धार्मिक भावनांवर बोट ठेवल्यास जनता विविध प्रांतात,भाषेत जरी विभागलेली असली तरी एकत्र येते हे राजकीय पक्षांच्या लक्षात आलं.

यातील गमतीचा भाग म्हणजे रामायण टीव्हीवर आणण्यात काँग्रेस सरकारने पुढाकार घेतला होता.याद्वारे हिंदूची मतं आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा मानस होता, पण याचा सगळ्यात जात फायदा झाला तो म्हणजे हिंदुत्ववादाचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद

दूरदर्शन वर रामायण सुरू झाल्यानंतर आणि ते संपल्यानंतर देखिल, संघ परिवाराने या हिंदू जागृतीच्या लाटेचा फायदा करून घेतला आणि सर्व हिंदू समाजाला एकत्र आणत हिंदू राष्ट्रवादाला बळकटी केला. ‘रामराज्य’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. आणि अयोध्येत बाबरी मशिद-राम जन्मभूमीचा वादही पेटायला सुरुवात झाली.

यातूनच निर्माण झाली राम जन्मभूमी चळवळ. दूरदर्शन वर पाहिलेल्या राम-लक्ष्मणासारखी वेशभूषा करत आणि ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा देत हिंदू कार्यकर्ते एकत्र येत होते. राम मंदिरासाठी विटा आणि देणग्या गोळा करण्याच्या मोहिमा देशभरात सुरू झाल्या आणी हिंदू समाज एकवटला गेला.

याच एकतेच्या बळावर हिंदुत्त्ववादी संघटनांनी 1992 मध्ये सुरू केलेल्या यात्रेत जवळपास दीड लाख लोक सहभागी झाले आणि ते अयोध्येपर्यंत चालत गेले. काहींनी 16 व्या शतकात उभारलेली बाबरी मशीद पाडली आणि यानंतर देशभरात याचे हिंसक पडसाद उमटले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा अखेर निकाल दिला आणि आता केंद्र सरकारने राम जन्मभूमी न्यास स्थापन करत अनेक वर्ष वादग्रस्त राहिलेल्या जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे.

मालिकेतून आलेल्या संज्ञा आणि प्रतीकं लोकांच्या मनात आणि सामाजिक संवादात रुजली आहेत. ‘रामराज्य’ ही संकल्पना अधिक लोकप्रिय झाली ती याच मालिकेनंतर आणि पंतप्रधान मोदी आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांना अनेकदा भाजपचे राम आणि लक्ष्मण म्हटलं.

हा रामायण मालिकेचा परिणाम आहे असं म्हणता येणार नाही पण या मालिकेमुळे लोकांना हिंदू प्रतीकांचा एक तयार संच मिळाला. भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची हिंदुत्ववादी परिभाषा लिहिण्यातही यांची मदत झाली.

परन्तु या मालिकेचा प्रभाव कल्पनेच्या पलिकडे जाणारा होता. या मालिकेचा राजकीय प्रभाव इतका होता की दीपिका चिखलिया (सीता) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) हे दोघे तर पुढे जाऊन खासदार झाले.

भारत 1990 च्या काळात नवीन ध्येय धोरणे आणि विकासाच्या पहिल्या टप्प्यात होता. आणि रामायण ह्या मालिकेचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात जनतेवर होता.

आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रामायण ही मालिका सुरू करण्यात आली आहे. किंबहूना एक संधी जीची वाट केंद्रीय सरकार पाहत होत की कोणत्या मार्गाने पुन्हा हिंदुत्ववादी लाट निर्माण कशी करता येईल ती आयतीच संधी कोरोना विषाणू मुळे मिळाली आहे. पाहू या पुढे ह्या रामायणातुन काय रामायण घडतं ते

संदर्भ- राहूल वर्मा यांचे द टी व्ही शो रामायण दॅट ट्रान्सफॉर्मड हिंदुईसम या लेखातून

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button