Amalner: पंडित नेहरू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे 21वर्षानंतर स्नेह संमेलन…
अमळनेर पंडीत नेहरू विद्यालयात माजी विद्यार्थी यांनी २१ वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन केले. यावेळी शिक्षकांचा सन्मान करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
फापोरे बु. येथिल सन २००० ते २०००१ या वर्षी ईयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेल्या पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय येथिल विद्यार्थी आपल्या गावी एकत्र येत स्नेहसंमेलन कार्यक्रम करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शाळेसाठी काही महापुरषांच्या प्रतिमा भेट दिल्या व सोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच गावातील सरपंच व उपसरपंच तसेच माजी विद्यार्थी राहुल आहिराव, ईश्वर पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर नेरकर, गोंविदा पाटील, योगेश पाटील, भैय्या पाटील, माधवराव नेरकर, राकेश नेरकर, महेंद्र नेरकर, गोरख पाटील, योगेश मासरे, रमेश पाटील, विलास पाटील, मिनाबाई मोरे, वैशाली नेरकर, पुष्पा पाटील, मिराबाई पाटील, सविता नेरकर, गणेश सैंदाणे, रामकृष्ण न्हावी, बाबुलाल गायकवाड, विनोद पाटील, धमेद्र शिंदे, सिमा पाटील अनिल पाटील आदी उपस्थित होते.