Maharashtra

सर्व संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर

 सर्व संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर

सर्व संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर

पेठ प्रतिनिधी शैलेश राऊत
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहे. हे काम करत असताना राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला दाखले, प्रधानमंत्री किसान योजना, श्रम योगी योजना, जन आरोग्य योजना, पीक विमा योजना, शौचालय उपलोडिंग, प्र. आवास योजना, अस्मिता योजना या वतिरिक्त महाऑनलाईन चे कामे ग्रामसभा, मासिक सभा, गाव विकास आराखडे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करतो. तरी सुद्धा याच संगणक परीचालकला मानधन मिळत नाही. राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी आश्वासन देऊन सुद्धा प्रत्येक महिन्याचे एका निछित तारखेला मानधन मिळत नाही. या बेमुदत आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या 
१) राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकाला आय. टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे.
२. पंचायत समिती व जि.प स्तरावरील संगणक परीचालकाला नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याचा शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आय.टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
३. सर्व संगणक परिचालक यांचे मानधन १४ वित्त आयोगातुन न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५००० रू देण्यात यावे
जो पर्यंत आमच्या वरील मागण्या शासन मान्य करीत नाही तोर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही
आम्ही पेठ तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पंचायत समिती चे मा खैरनार साहेब (OS) व विस्तार अधिकारी      मा सादवे साहेब यांना निवेदन देताना मा. अध्यक्ष प्रकाश महाले, सचिव मंगेश गवळी, व केंद्रचालक शैलेश राऊत, सीताराम कामडी, शांताराम नाठे, किरण ढेंगळे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button