Amalner

Amalner: शेतात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू..

Amalner: शेतात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू..

अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील ज्ञानेश्वर बापू कोळी वय 33 याचा
सावखेडा रस्त्या वरील शेतात बैलांसाठी चारा गवत कापत असताना विजेचे धक्का
लागला त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे चोपडा ग्रामीण रुग्णालय चोपडा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंगसे सावखेडा रस्त्यावर असलेल्या शेतात ज्ञानेश्वर बापू कोळी हा गुरांसाठी चारा कापत असताना आज दुपारी दोन ते अडीच
वाजेच्या दरम्यान त्याला विजेचा धक्का लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने पुढील उपचारासाठी चोपड़ा नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले .त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले., चार बहीणी, आई-वडील, व दोन काका असा परिवार आहे. ते माजी सरपंच बापू संपत कोळी यांचा मुलगा होते.अपघाती निधन झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button