Amalner

जळगाव येथील सराईत गुन्हेगार अमळनेर पोलिसांच्या ताब्यात..!सलग दुसरी मोठी कामगिरी…!

जळगाव येथील सराईत गुन्हेगार अमळनेर पोलिसांच्या ताब्यात..!सलग दुसरी मोठी कामगिरी…!

दिनांक २१/०९/२०२१ रोजी धुळे शहर पोस्ट हद्दीत धुळे शहरातील बांधकाम भवन विभागाच्या आवारातुन अँक्टीवा गाडी चे डिकीतुन लॉक तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने ३,८०,०००/- रुपये रोख चोरुन नेले होते.शहर पोलीस स्टेशनला अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल होता. नमुद अनोळकी चोरट्याचे
सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये चोरटे व चोरट्यानी वापरलेली एफ.झेड मोटर सायकल दिसुन येत होती सदर बाबतचे सी.सी.टी.व्ही फुटेज नमुद पोस्टेकडुन व्हायरल झाले होते. दि.२९/०९/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक श्री. जयपाल
हिरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार व फुटेज मधील दिसणारे इसम हे जळगांव येथील राहणारे अजय बिरजु गांरुगे व त्याचे सोबत असलेला रितेश कृष्णा शिंदे असे असुन ते त्याच्याजवळील एफ.झेड.मोटर सायकल वरुन अमळनेर शहरात येत असल्याबाबत पेट्रोलींग ड्युटीचे अंमलदार पोना दिपक माळी,पोकॉ रविंद्र पाटील यांना माहिती देवुन त्यांना पकडणेबाबत सांगितले होते. त्याप्रमाणे दि.२९/०९/२०२१ रोजी नमुद अंमलदार यांनी अमळनेर शहरातील बस स्थानकासमोर रोडवर थांबुन सापळा लावला असता २०.३० वा.च्या सुमारास अजय बिरजु गांरुगे व त्याचा साथीदार हितेश कृष्णा शिंदे अशांना त्यांच्या जवळील एफ.झेड मोटर सायकल क्रंमाक MH-१९-CT-५३१२ सह पकडुन त्यांना विचारपुस केली असतानमुद दोन्ही इसमांनी कर्तव्यावरील नमुद अंमलदार यांना जोराने ढकलुन खाली पाडले ते लागलीच उठुन त्यांना योग्य बळाचा वापर करून पकडले असता
दोघांनीही त्यांच्याशी हुज्जत बाजी घालुन त्यांची शर्टाची कॉलर धरुन ओठाताण केली तेव्हा शासकिय गणवेशाच्या शर्टाचे एक बटन व डाव्या साईटकडील खिसा फाडुन शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला त्यांना पोलीस
स्टेशनला आणुन नमुद दोन्ही इसमांना विचारपुस करता त्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांचे वरील दाखल गुन्ह्याचा अभिलेख पाहता इसम नामे अजय बिरजू गारुंगे याच्यावर जळगांव जिल्हा मधील एम.आय.डी.सी. जळगांव,धरणगांव,रामानंद नगर,शनिपेठ,जिल्हापेठ,चोपडा शहर, पाचोरा,भुसावळ बाजारपेठ,चाळिसगांव,एम.आय.डी.सी. वाळूज औरंगाबाद, आझादनगर धुळे,धुळे शहर शाहदा,बारामती,सराई रोहिला दिल्ली येथे भादवि ३९५,३९७,३९२,३७९,३०७,३५४,३९९ यासारखे गंभीर स्वरूपाचे त्याचे इतर २१
साथीदारांसह त्याने वरील ठिकाणी गुन्हे केले असुन त्याच्यवर असे एकुण २८ गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपी अजय बिरजु गारंगे रा. तांबेपुरा खदान जवळ जळगांव,२) रितेश कृष्णा शिंदे रा. सुप्रीम कॉलनी जळगांव यांचे विरूद्ध पोकॉ रविंद्र अभिमन पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून त्यांच्याविरूद्ध अमळनेर
पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन ४११/२१ भादवि कलम ३५३,४२७ प्रमाणे दि. २९/०९/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि.राकेशसिंह परदेशी हे करीत असुन आरोपीताकडुन गुन्हयात
बटन चा चाकु व एक मास्टर कि, असे हस्तगत करण्यात आले आहे. नमुद आरोपीला दि. ३०/०९/२०२१ रोजी अटक करण्यात आली असुन पोना दिपक माळी व पोकॉ रविंद्र पाटील हे गुन्हयाचे तपासकामी मदत करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button