sawada

निकृष्ट गटारीची तात्काळ चौकशी व्हावी : ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे – सा.बां.विभाग सावदा कडे जागृत नागरिकांनी केली तक्रार

निकृष्ट गटारीची तात्काळ चौकशी व्हावी : ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे – सा.बां.विभाग सावदा कडे जागृत नागरिकांनी केली तक्रार

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यांतील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे सार्वजनिक बांधकाम विभागच्या कार्यालय समोर आमोदा-भिकनगांव या माहामार्गाच्या दोन्ही बाजूला लाखो रुपये खर्च करून महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या नविन गटारी निकृष्ट दर्जाची बांधण्यात आलेली आहे.अवघ्या काही दिवसांतच गटारी चा एक भाग कोसळून पळून गेलेला आहे. यावरून सिद्ध होते की ठेकेदारांनी मनमानी करून सदर गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत.

तसेच विकासाच्या दृष्टीने सरकार दर्जेदार उत्कृष्ट व टिकाऊ कामे व्हावी या हेतूने अमाप पैसा खर्च करून ठेकेदारांना देतात. मात्र सदर प्रकारे निकृष्ट दर्जाची नवीन कामे ठेकेदाराकडून होत असेल व एका महिन्यात गटारी पडुन जात असेल तर ठेकेदार कडून नविन व आधुनिक पद्धतीने इस्टिमेट प्रमाणे टिकाऊ कामाची अपेक्षा ठेवणे म्हणजे गाफिल पाणा नाही का? परिणामी शासनाकडून खर्च होत असलेला लाखोंचा निधी थेट पाण्यात जात असल्याचे उघड दृश्य सदरील झालेले निकृष्ट काम व पडलेल्या गटारीचा एक भाग बरेच काही सांगून जात आहे.तसेच सदरील गटारी काही ठिकाणी अर्धवट व अपूर्ण स्थितीमध्ये दिसून येते. मात्र याकडे जाणीवपूर्वक रित्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी कडून डोळेझाक केली जात असल्याने दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक जागरूक नागरिक, शेख फरीद शेख नुरोद्दीन,दिलिप रामभाऊ चांदेकर, युसूफ शाह सुपडू शाह यांनी सदरील निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी होऊन ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी सहाय्यक अभियंता बी.एन. शेख सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा यांच्याकडे दिलेल्या तक्रार द्वारे केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button