Amalner

अमळनेर: धार येथून विवाहित महिला चार मुलींसह बेपत्ता….

अमळनेर: धार येथून विवाहित महिला चार मुलींसह बेपत्ता….

अमळनेर येथील धार गावातील रहिवासी विवाहित महिला आपल्या चार मुलींसह बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या बाबतीत मारवड पोलिस ठाण्यात मिसिंग ची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की सोमागीर गोसावी यांची पत्नी कविता सोमागीर गोसावी (वय 32) दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास दवाखान्यात जावून येते असे सांगून घरातून बाहेर पडली. तिच्यासोबत कु. प्रेरणा – वय 14,दिव्या- वय 12, मयुरी- वय 10 , परी- वय 5 ह्या मुली असून त्यांचा गावात शोध घेतला पण त्या मिळून आल्या नाहीत त्यामुळे सोमागिर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मारवड पोलिसात मिसिंग ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. ना. मुकेश साळुखे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button