मा. आ. राम सातपुते माळशिरस पूर्व भागात लक्ष देणार का?
महेश घाडगे,
मळोली प्रतिनिधी,
मळोली ता. माळशिरस, येथील मळोली- तांदुळवाडी, मळोली – शेंडेचिंच,
मळोली- कुसमोड , हे रस्ते गेली सुमारे 15 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रत्येक्षेत असून या कामी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार. श्री. राम सातपुते हे स्वतः लक्ष देऊन या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून हे रखडलेले रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून या भागातील या रोड वरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे हाल थांबवितील का असा प्रश्न सामान्य नागरिक यांच्यामध्ये चर्चेला येत आहे,
मळोली , तांदुळवाडी, निमगाव,शेंडेचिंच, या भागातील एकमेकांना जोडणारे रस्ते व त्यांची दुर्दशा पाहिली तर ,हा रस्ता आहे की ,एखाद्या दुर्गम भागातील बैलगाडीची वाट आहे का असा प्रश्न पडतो सुमारे 15 वर्षात केवळ 1 ते दीड किमी अशा पद्धतीने ,,मलमपट्टी ,,करून या भागातील शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी व आरोग्याशी खेळण्याचे मोठे कारस्थान केलं जातं आहे या रोड वरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ,मणक्याचे आजार उद्धभवले असून अनेक शालेय विद्यार्थी सायकल वरून पडून जखमी झालेले आहेत ,प्रशासन सुस्त असते हे सर्वांना ठाऊक आहे परंतु एवढं सुस्त प्रशासन व या भागाचे या अगोदरचे लोकप्रतिनिधी यांनी कसा व काय विकास केलाय हे जर आपणास पाहायचं असेल तर आपण एक वेळ नक्कीच मळोली ते शेंडेचिंच हा प्रवास कराच निश्चितच आपणास याचा प्रत्येय आल्याशिवाय राहणार नाही आजूबाजूस वाढलेली काटेरी झाडे,मोठं मोठे खड्डे,बाजूस झालेली अतिक्रमण,मुजलेली गटारे आपणास निश्चितच या रोडच्या समस्या दिसून येतील अनेकवेळा शासनदरबारी वेगवेगळ्या नेत्यांच्या कानावर या रस्त्यांच्या समस्या जाऊनही मुद्दाम दुर्लक्ष करून टाळण्याचे प्रकार घडत आहेत सध्या,
माळशिरस तालुक्याचे, धडाडीचे आमदार. श्री. राम सातपुते यांच्या कामाचा धडाका,,व कार्यतत्परता पाहून या भागातील नागरिकांच्या त्यांच्याकडून या रस्त्याच्या प्रकरणास नक्की न्याय मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे…
