Paranda

कंडारी येथील काळभैरवनाथ याञा रद्द

कंडारी येथील काळभैरवनाथ याञा रद्द

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कंडारी ता .परंडा येथील काळभैरवनाथ जोगेश्वरी या देवस्थान ची यात्रा लॉकडाऊन सुरू असल्याने रद्द करण्यात आली आहे .

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे परंडा तालूक्यातील कंडारी येथील काळभैरवनाथ देवस्थानची दि. १४ एप्रील ते २० एप्रील या कालावधीत आयोजित करण्यात आलेली यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान च्या ट्रष्टने घेतला आहे.

अत्यंत प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत १४ एप्रील रोजी परंपरेने पहाटेे देवाला ओल्या पडद्याने दंडवत .नंतर दुपारी १२ वाजता कावड मिरवणुक व त्या नंतर अंबीलचा नैवेद्य आर्पण केला जाणार होता . परंपरेने त्याच राञी काळभैरवनाथ जोगेश्वरी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा होता.

तर दि १५ रोजी जंगी कुस्त्यांचे सामने आयोजित केले होते. मात्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच यात्रेत राज्य सह पर राज्यातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ग्रामस्थांनी व ट्रष्टीने खबरदारी म्हणून यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेसाठी येणारे भाविक भक्त आणि मल्ल यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button