Maharashtra

तळेगाव सबस्टेशनवर सभापती उपसभापतीसह तमगव्हाण माळशेवगे पिंपळवाड गावकऱ्यांचा मोर्चा

तळेगाव सबस्टेशनवर सभापती , उपसभापतीसह तमगव्हाण , माळशेवगे , पिंपळवाड गावकऱ्यांचा मोर्चा

प्रतिनिधी मनोज भोसले

चाळीसगाव तालुक्यातील १३२ केव्हीचे दुरूस्ती झालेली असतांना देखील तमगव्हाण , माळशेवगे , पिंपळवाड आदी गावानां तळेगाव सबस्टेशन मधुन या गांवाना ८ तासाऐवजी फक्त ४ तास थ्रीफेज लाईट सोडली जात व्हती यामुळे तिन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला तसेच शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिके नदीत पाणी असुन देखील लाईट नसल्याने पुर्णपणे जळुन खाक होत आहेत लाईट ही चारतास सोडली जाते त्यातही या तमगव्हाण , माळशेवगे , पिंपळवाड या गावांना चारतासात फक्त अर्धातास लाईट टिकते त्यामुळे तीनही गावांमधील सरपंचासह पंचायत समिती सभापती अजय पाटील , उपसभापती सुनिल पाटील पंचायत समिती सदस्य विष्णु चकोरसर , तमगव्हाणचे माजी विकासोसायटी चेअरमन संजय सानप, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा मोर्चा तळेगाव सबस्टेशनवर गेला याठिकाणी सभापती अजय पाटील उपसभापती सुनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तळेगाव सबस्टेशनचे इंजिनिअर काटकर साहेब यांना सांगुन तात्काळ लाईट सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या या गावातीत सरपंच व शेतकऱ्यानी इंजीनीअर काटकर यांनी धारावर धरले यावेळी तालुका कार्यकारी अभियंता दिपक शेंडगे यांच्याशी फोनवरून सभापती अजय पाटील यांनी माजी आमदार राजीवदादा देरामुख यांनी देखील फोनवर चर्चा झाली लाईट दोन दिवसात सुरळीत करू असे आश्वासन कार्यकारी अभियंता दिपक शेंडगे , व उपकार्यकारी अभियंता बाविस्कर यांच्याशी चर्चा करून इजिनिअर काटकर यांनी दिले तेव्हा सर्व शेतकरी माघारी झाले यावेळी तळेगाव सबस्टेशनचे लाईनमन कर्मचारी मोरे हे शेतकऱ्यांनां फोनवर अरेरेवी ने बोलतात म्हणुन त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी लेखी तक्रार शेतकर्यानी करून तात्काळ बदली करण्याबाबत कार्यकारी अभियंता दिपक शेंडगे व बाविस्कर यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी तमगव्हाण सरपंच सुनिल पाटील ,तमगव्हाण विकासो चेअरमन बाजीराव पाटील ,प्रकाश पाटील , दादाभाऊ पाटील , भाऊसाहेब पाटील माळशेवगे येथिल सतिष पाटील , सागर पाटील , एकनाथ पाटील , पिंपळवाडचे उपसरपंच सावळीराम सानप , बाळु इप्पर , भाऊसाहेब डोंगरे , भैय्या लोधे , यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button