Maharashtra

बाई बुब्ज आणि ब्रा च्या कडक उत्तरा नंतर पुन्हा हेमांगी कवीने दिले नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर….

बाई बुब्ज आणि ब्रा च्या कडक उत्तरा नंतर पुन्हा हेमांगी कवीने दिले नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर….

मुंबई मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असते.सध्या काही दिवसांपूर्वी हेमांगी तिच्या सडेतोड उत्तर आणि सोशल मीडियावरील पोस्ट मुळे खूपच चर्चेत आहे.नुकतेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिला खूप टिका सहन करावी लागली पण अत्यन्त परखडपणे तिने नेटकऱ्यांना उत्तर दिले आहे. आता तिने रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या एका पोस्टवर पुन्हा परखड मत मांडले आहे.

हेमांगीने पोस्ट शेअर करत सांगितले की, ‘मी सोशल मीडियावर जे काही लिहिते, व्यक्त होते किंवा कुठलेही फोटो, व्हिडिओ शेअर करते. त्यावर लोकांची हमखास एक प्रतिक्रिया असते. तुझ्या घरचे सोशल मीडियावर नाहीयेत का? घरचे म्हणजे खासकरून घरातील पुरुष मंडळी. बाबा आणि भाऊ. हो आहेत की! बाबा होते पण आता ते नाहीयेत.

पुढे ती म्हणते, माझा भाऊ आहे सोशल मीडियावर आणि तो बघतो, वाचतो माझ्या सगळ्या पोस्ट. त्यावर दादाची एकच रिअ‍ॅक्शन असते. गुड ऑर बॅड. मी आहे तुझ्यासोबत, तुझं रक्षण करायला. लहानपणी राखी पोर्णिमेच्या दिवशी औक्षण करून एक धागा बांधायचा आणि मोबदल्यात जे काही मिळायचं/ मिळवायचं गिफ्ट. पैशांपासून ‘मी आहे तुझ्यासोबत’ हे गिफ्ट आणि पैशापलिकडे गेलेलं नातं खूप भारी आहे आणि म्हणूनच मी नाही घाबरत.’ असे म्हणत तिने नेटकऱ्याना उत्तर दिले आहे.
काही दिवसापूर्वीच हेमांगीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्ट चर्चेत राहिली होती. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले होते. तसेच ती ट्रोल करणाऱ्यांनाही रोखठोक उत्तर देत असल्याचे पाहायला मिळाले होते.

संबंधित लेख

Back to top button