India

साडी घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारणाऱ्या रेस्टॉरंट वर अखेर कार्यवाही..!बंद केले रेस्टॉरंट..!

साडी घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारणाऱ्या रेस्टॉरंट वर अखेर कार्यवाही..!बंद केले रेस्टॉरंट..!

नवी दिल्ली : साडी घातलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. प्रवेश नाकारताना साडी ‘स्मार्ट ड्रेस’ नाही, असे सांगून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला होता. साडी परिधान केलेल्या प्रवेश नाकारणाऱ्या अंसल प्लाझा येथील अक्विला रेस्टॉरंटला टाळे लागले आहे. दक्षिण दिल्ली नगर निगमने हे रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस बजावली. त्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे.

दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने आरोप केला आहे की रेस्टॉरंट हेल्थ ट्रेड लायसन्सशिवाय चालत होते. त्यानंतर मालकाला नोटीस बजावण्यात आली आणि त्याने हे हॉटेल बंद केले.

हे रेस्टॉरंट वैध परवान्याशिवाय चालत होते. प्रशासनाने प्रथम नोटीस बजावली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अक्विला रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात साडी नेसून आलेल्या महिलेला प्रवेश नाकारला होता. त्यांनी त्यावेळी सांगितले होते, साडी स्मार्ट ड्रेसमध्ये येत नाही.

गेल्या आठवड्यात एका फेसबुक पोस्टमध्ये एका महिलेने दावा केला होता की तिला अक्विला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला. कारण तिने साडी घातली होती. या महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओही पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये एका कर्मचाऱ्याला साडी हा स्मार्ट ड्रेस नसल्याचे सांगताना दाखवण्यात आले. महिलेने तिच्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले. असे रेस्टॉरंट च्या मालकांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button