Dhule

दुष्कर्म करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा करून फासावर चढवावे अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल -शिरपूर तालुक्यातील आदिवासी संघटना आक्रमक.!

दुष्कर्म करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा करून फासावर चढवावे अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल -शिरपूर तालुक्यातील आदिवासी संघटना आक्रमक.!

राहुल साळुंके धुळे

धुळे : दिनांक १७जून रोजी शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिस स्टेशन येथे शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी साबलापाणी येथून आलेल्या एका गरीब मजुर आदिवासी कुटुंबातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून डॉक्टर व नर्स च्या मदतीने गर्भपात करून दुष्कर्म केल्याच्या घटना झाली आहे व शिरपूर येथील निमझरी नाक्याजवळील भागात एका तरुणीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली ह्या दोघी घटना मानव जातीला काळीमा फासणाऱ्या आहे मानव जातीला शरमेने मान खाली घालवणाऱ्या आहेत ह्या घटनेचा जाहीर निषेध व सदर आरोपीस लवकरात लवकर फाशीची कठोर शिक्षेची मागणीकरीता आज सांगवी पोलीस स्टेशन येथे जयस (जय आदिवासी युवा शक्ति) महाराष्ट्र शिरपूर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बिरसा क्रांति दल व रावणराजे प्रतिष्ठान शिरपूर मार्फत सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सुरेश शिरसाठ साहेबांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहेत कि मा. महोदय, या देशात “सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ” चा नारा छान दिला जातो मात्र ते फक्त सरकार चालवण्यासाठी, प्रत्यक्षात मूली वाचल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न काही होत नाही. मूलीवर दिवसेंदिवस होत असलेल्या वाढत्या अत्याचाराला जबाबदार सरकार आहेत, सरकारच्या हलगर्जीपणामुळे बलात्काऱ्याला कठोर शिक्षा होण्याऐवजी मुलींवर अत्याचार करण्याची चालना मिळते .
म्हणून बलात्कार करणारा कोणत्या ही जाती धर्माचा असो, गरीब- श्रीमंत असो त्याला फाशी झालीच पाहिजे, फक्त बेटी बचाव बेटी पढाओ चा नारा चालणार नाहीत तर सरकार ला या निर्दोष बालिकेस न्याय द्यावाच लागेल.
तसेच याबाबतीत कार्यवाही करण्यास शासन- प्रशासनाकडून कसूर झाल्यास महाराष्ट्रातील तमाम समविचारी सामाजिक संघटना कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदना द्वारे देण्यात आला यावेळी जयस चे राज्य प्रवक्ता दिनेश सी पावरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महारास्ट्र युवा अध्यक्ष दारासिंग पावरा, बिरसा क्रांति दलाचे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, जयसचे शिरपुर तालुका उपाध्यक्ष जगदिश पावरा, संपर्क प्रमुख सुनील पावरा, संजय पावरा, दिनेश पावरा , आदिवासी विकास परिषद चे चोपड़ा तालुका सचिव कालूसिंग पावरा, रावनराजे फॉउंडेश चे अध्यक्ष विनोद पावरा, राहुल गुरव, मंगल पावरा, आदि उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button