Amalner

अवघ्या 3 तासात आरोपी ताब्यात ..अमळनेर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी..!

अवघ्या 3 तासात आरोपी ताब्यात ..अमळनेर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी..!

अमळनेर येथील रात्रीचा थरार खून प्रकरणात आरोपी अवघ्या 3 ते 4 तासांत तपास करून ताब्यात घेतला आहे. चोपडा येथुन आरोपी कैलास पांडुरंग भोई यांस ताब्यात घेण्यात आले आहे.

अमळनेर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक होत आहे.दरम्यान जळगांव चे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली असून संपूर्ण महिती घेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कौतुक केले आहे. या संपूर्ण प्रकरणात सहा पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यन्त कमी वेळात आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आताच हाती आलेल्या बातमी नुसार आरोपी यास चोपडा येथून सुनील हटकर व मिलिंद भामरे यांनी चोपडा येथून पकडून अमळनेर पोलीस ठाण्यात आणले आहे व आज चौकशी अंती उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सदर आरोपी फरार झाला होता. पैश्यांच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. भल्या पहाटे ही घटना घडल्या नंतर कैलास फरार झाला होता. अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.घटनास्थळी फॉरेन्सिक पथक उपस्थित होते. खून ज्या हत्याराने झाला ते घटनास्थळी मिळून आले नसून या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे.अमळनेर ग्रामीण रुग्णालय आणि घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.हशीमजी प्रेमजी संकुला जवळील रस्त्यावर MH-11 BL 9267 ह्या बसने पोलीस गाडीस धक्का साईडने टच केल्याने त्यास जागेवरच थांबविण्यात आले होते.

सकाळी 7 वाजेपासून ते आरोपी ताब्यात येईपर्यंत सहा पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी अजिबात उसंत न घेता भराभर सूत्रे फिरवत आपल्या पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीने अत्यन्त उत्तम कामगिरी पार पाडली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button