सुरगाणा प्रतिनिधी दीपक भोये
सुरगाणा तालुक्यातील 80 ते 90 % रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याचे काम झाल्यानंतर पाच वर्षे रस्ता खराब झाल्यास संबंधित विभाग व ठेकेदारांची असते. पण हा तालुका आदिवासी असल्याने या संधीचा फायदा घेऊन या भागात निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात. त्यात या भागात पाऊस खुप पडतो. त्यामुळे दुसऱ्याच वर्षी रस्ते खराब होतात. पण या भागात जागरूक नागरिक नसल्याने लगेच कोणीही समस्या मांडत नाहीत.
पण आता याच तालुक्यातील जाहुले-मनखेड रस्त्याची, हेमाडपाडा-मनखेड या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या दुरावस्थेची तक्रार समस्या थेट पंतप्रधान कार्यालयात गेली आहे. जाहुले ते मनखेड या रस्त्याचे काम होऊन दहा वर्षे पण झाली नसुन रस्ता पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी हा रस्ता खराब झाला होता. कोणीही जागरूक नागरिक पुढे न आल्याने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. तसेच मनखेड-हेमाडपाडा या पुलावरती खड्डेच खड्डे पडले असुन त्यातील गज बाहेर निघाल्याने वाहनांना त्रास होत असतो तसेच पावसाळ्यात कमी जरी पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी वाहत असते त्यामुळे ऑडिट करून नवीन उंच पूल बांधण्यात यावे, याबाबतीत सदरील विभागाला आदेश देऊन सदर काम पुर्ण करावे.
या कारणास्तव पेठ डेपोची पेठ-मनखेड, पेठ-औरंभा ही मुक्कामी एस.टी. बस जाहुले पर्यन्त येत असून पुढे येत नसल्याने या भागातील प्रवाशांना त्रास होत आहे.
अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपक भोये यांनी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे.







