Maharashtra

पोलीस निरीक्षक अमळनेर व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या मध्यस्थीने १५ आँगस्ट रोजीचे उपोषण रद्द

    सानेनगर अमळनेर येथील आदिवासी पारधी समाजाचे मधुकर धडू चव्हाण यांच्या घरासमोर तेथील लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे.मधुकर चव्हाण यांनी नगरपालिकेला अतिक्रमण काढने करिता वेळोवेळी पत्रव्यवहार करून हि नगरपालिका प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नसल्याने मधुकर चव्हाण यांनी दिनांक १ आँगस्ट २०१९ रोजी नगरपालिका समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले होते.काल दिनांक १३/८/२०१९ रोजी अमळनेर पोलिस निरीक्षक श्री अंबादास मोरे साहेबांनी उपोषणा बाबत अर्जदारास बोलावून चौकशी केली व अर्जदारास व नगरपालिकेला योग्य सुचना दिल्या व आज रोजी नगरपालिका प्रशासनाने अर्जदारासह आदिवासी पारधी विकास परिषदेच्या पदाधिकारींना चर्चेकरिता आमंत्रित केले होते चर्चेत अर्जदाराच्या अर्जानुसार योग्य ती कारवाई करत १५ दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्यात येईल असे पत्र देण्यात आले मिळालेल्या पत्रानुसार अर्जदाराचे समाधान झाले असून त्यांनी उद्याचा आमरण उपोषणाचा निर्णय रद्द केला आहे. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर मॅडम,आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, फोनवरून पोलीस निरीक्षक  अंबादास मोरे साहेब,अर्जदार मधुकर चव्हाण, तालुका अध्यक्ष अविनाश पवार, वना दाभाडे, प्रकाश सोनवणे,नंदाबाई मावळे, बांधकाम अभियंता संजय पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन उद्याचे उपोषण रद्द झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button