Amalner

बोरी नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर ताब्यात..! 5 ट्रॅक्टर पैकी 3 फरार..! फरार 3 ट्रॅक्टर कोणाचे…! गहन प्रश्न…!फोनाफोनी आणि बरंच काही..!

बोरी नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर ताब्यात..! 5 ट्रॅक्टर पैकी 3 फरार..! फरार 3 ट्रॅक्टर कोणाचे…! गहन प्रश्न…!

अमळनेर आज दि ०२-०८-२०२१ रोजी अमळनेर पो स्टे हद्दीत हिगोणा शिवारात बोरी नदीच्या पात्रात दोन स्वराज कंपनीचे टॅक्टर चोरटी वाळू वाहतूक करत आहेत. अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे यांना मिळाली त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशन चे पथकातील अमलदार अरुण बागुल व विलास बागुल अशांनी बोरी नदीच्या पात्रात जाऊन दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर याच्या ड्रायव्हर यास नाव विचारले असता ट्रॅक्टरचे मालक अमोल नारायण शिंदे व चालक रवींद्र युवराज मोरे दोन्ही राहणार रत्नापिंप्री तसेच निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे अमळनेर येथील दिपक जगन्नाथ भोई ट्रॅक्टर मालक व गोविंद महादू बिल ड्रायव्हर असे सांगितले.

अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्यावर पो. स्टे. गु. र. नंबर ३२७/२०२१ भादवी ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिशय महत्वपूर्ण विषय म्हणजे एकूण 5 ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत होते. त्यातील 3 ट्रॅक्टर फरार झाले आहेत. ह्या 3 ट्रॅक्टर चे फोटो देखील पोलिसांकडे उपलब्ध आहेत.पण त्यांचा कोणताही तपास न लागता दोनच ट्रॅक्टर वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.फरार ट्रॅक्टर पैकी एक बाळू पाटील आमदारांचे कार्यकर्ते,जमाल आणि रोहित कंखरे असे फरार ट्रॅक्टर मालक आहेत अशी माहिती मिळाली आहे.काल देखील एक ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेल्या नंतर सोडल्याची माहिती मिळाली आहे. या बाबत उलट सुलट चर्चांना ऊत आला असून पोलीस प्रशासनाच्या कार्यवाही वर शंका घेतली जात आहे.पोलीस प्रशासन त्यांचे कार्य उत्तम रित्या करत आहे पण लागोपाठ दोन दिवस घडलेल्या घटनांची चर्चा रंगात आली आहे.सर्व ट्रॅक्टर धारकांवर गुन्हे दाखल करण्याची चर्चा सुरू होती. यात अप्रत्यक्ष रित्या आमदारांचा हस्तक्षेप होत असल्याची चर्चा गावात जोरदारपणे रंगली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button