kalamb

इटकुर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 2 लाख 50000 ची चोरी

इटकुर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 2 लाख 50000 ची चोरी

सलमान मुल्ला कळंब

कळंब : तालुक्यातील इटकुर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील २ लाख ५०००० रुपये किमतीच्या ८ एलईडी टिव्ही संच चोरट्याने पळविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यामुळे मात्र परिसरात घबराटीचे वातावरण आहे..

कळंब तालुक्यातील इटकुर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे, यासाठी शिक्षक सहकारी पतसंस्था, शिक्षक, गावकऱ्यांच्या लोकसहभागातून व ग्रामपंचायतच्या पुढाकारातून 12 टीव्ही संच बसविण्यात आले होते.

मात्र कळंब तालुक्यात दोन दिवसांपासून होत असणाऱ्या पावसामुळे अज्ञात चोरट्याने रविवारी रात्रीच्या वेळी पाऊस असल्याने याचा फायदा घेत चोरट्याने कुलपचा कोंडा कापुन आत प्रवेश करून कार्यलयाचे कुलूप तोडले व बॉक्समध्ये असलेल्या ८ एलईडी चोरट्याने पळविल्याची घटना सोमवारी शाळेच्या शिक्षकांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button