India

? टॉलिवूड.. कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी ड्रग्ज प्रकरणात अटकेत…

? टॉलिवूड.. कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी ड्रग्ज प्रकरणात अटकेत…

बेंगलुरू:

शुक्रवारी सकाळी कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी यांना घरी अटक करण्यात आली आहे.

सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) बुधवारी अभिनेत्रीला नोटीस वाजवून गुरुवारी त्यांना हजर करण्यास सांगितले होते, परंतु तिने सोमवारीपर्यंत वेळ मागण्याचा वकिलांमार्फत प्रयत्न केला. परंतु शुक्रवारी पोलिसांनी हजर राहण्याचे निर्देश दिले.

सविस्तर माहिती अशी की ड्रग्ज प्रकरणी कन्नड फिल्म इंडस्ट्रीत संबंध असलेल्या रवीला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला पाच दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील गायक आणि कलाकारांना ड्रग्ज पुरवठा करणारया शहरातील तीन जणांना अटक केल्यानंतर सीसीबीने बंगळुरुमधील ड्रग्सच्या तपासणीचा तपास कडक केला आणि या संदर्भात अनेक लोकांवर लक्ष ठेवण्यात आले होते.

रागिनी द्विवेदी ज्यांचे कुटुंब हरियाणाच्या रेवाडी येथील आहे, त्यांचा जन्म बेंगळुरू येथे झाला होता. तिने सिनेमातून वीरा मडाकरी या चित्रपटा तुन २००१ मध्ये प्रदार्पण केले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button