Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात महिला सबलीकरणासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले :- डॉ. भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात महिला सबलीकरणासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले :- डॉ. भारती पवार

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत मुखेड ता. येवला येथे उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटांचा मेळावा संपन्न झाला. सर्व महिला बचत गट छोटे-मोठे उद्योग व व्यवसाय करत असलेल्या बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले.
तसेच काही महिला शेळीपालन, कुक्कुटपालन,ब्युटी पार्लर ,शिवणकाम, पैठणी विणकाम व्यवसाय करत असून अधिकाधिक महिलांनी राष्ट्रीयकृत बँक यांच्या सहकार्याने हे छोटे उद्योग जास्त संख्येने कसे करता येतील, तसेच या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
यावेळी डॉ. भारती पवार यांनी टिफिन बैठकीत सहभागी होत महिलां सोबत स्नेहभोजन केले. यावेळी महिलां सोबत संवाद साधत थेट नऊ वर्षांच्या काळात पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या लोककल्याणकारी योजना, विकास कामे, शक्तीशाली भारत निर्माणासाठी झालेले ऐतिहासिक निर्णय हे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले.
यावेळी सुवर्णाताई जगताप, अमृता पवार, आनंद शिंदे, पुष्पा वाघ,कैलास सोनवणे,रामहरी संभेराव, राजूसिंग परदेशी,बाबा डमाळे, केदारनाथ वेलुंजकर, दिनकर आहेर, रवींद्र आहेर,संगीता दिवटे,कृष्णा कव्हात,गणेश गायकवाड,दिपिका जैन, संतोष भटकर, विशाल ठमके, संतोष केंद्रे, श्रावण जावळके,चेतन दवे, युवराज पाटोळे,अरूण आव्हाड, मिनानाथ पवार, सुनिल सोमसे, दिनेश परदेशी, स्मिता कुलकर्णी, रंजना शिंदे तसेच तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे,वरीष्ठ पोलिस निरीक्षक क्षिरसागर सह पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button