Shirdi

शिर्डी शहरामध्ये गांजा विक्री करणारा ईसमास मुददेमालासाह गजाआड

शिर्डी शहरामध्ये गांजा विक्री करणारा ईसमास मुददेमालासाह गजाआड

राहुल फुंदे

उपविभागिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना बातमी मिळाली की , शिडी शहरातील सौदडीबाबा रोड , कालिकानगर . शिर्डी येथे नामे गफुर जेमुददीन शेख , रा . कालीकानगर , ता . राहाता हा त्याचे राहाते घरामध्ये गांजा विक्री करत आहे . अशी गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली . सदर बातमी प्रमाणे सौंदडीबाबा रोड , कालिकानगर , शिर्डी , ता . राहाता येथे तात्काळ पथक पाठवुन खात्री करुन तात्काळ कारवाई करा असे कळविले वरुन सपोनि दिपक गंधाले . सपोनि मिथुन घुगे , सपोनि प्रविण दातरे , पोना / १२४६ पी . डी . अंधारे , पोना / १७६८ बो . वाय . सातपुते , पोना / २१८६ गणेश सोनवणे , पोना / गडाख , चालक पोना / १२७३ बी . एस . वर्ष , चालक पोकॉ / १८०३ डी . आर . गांगुडे , पोशि गजानन गायकवाड , पोशि / फिरोज पटेल , पोशि सचिन पगारे मपोकॉ / १९३१ एस . आर . भारमल असे पंचांसह योग्य ती साहित्य साधने घेऊन बातमीप्रमाणे खात्री करणे कामी रवाना होऊन सदर इसमाच्या घरी शोध घेतला असता इसम नाम गफुर जमुददीन शेख वय – ७० वर्ष रा , कालीकानगर , ता . राहाता हा त्याचे राहते घरी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करतांना मिळुन आला . त्याचे राहते घराची झडती घेतली असता त्याचे कन्नामध्ये एकुन २ किलो ८०० ग्रॅम वजनाचा २८००० / हजार रुपये किंमतीचा गांजा मिळुन आला सदर गांजा जागेवर पंचासमक्ष सिल करुन त्याचेकडे सदर गांजा त्याने कोठून आणला आहे याबाबत विचारणा केली असता त्याने त्याबाबत ऊडवाउडवीची उत्तरे दिली त्यावरुन त्यास जागेवर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणुन त्याने बेकायदेशिर पणे शिडी शहरामध्ये विक्री करण्याचे उददेशाने गांजा बाळगला म्हणुन त्याविरुध्द शिर्डी पोलीस स्टेशनला सपोनि मिथुन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन काल दि . ०८ / ०५ / २०२० रोजी शिर्डी पोलीस स्टेशन गुरन २८० / २०२० गुगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधक अधि . १९८५ चे कलम २० ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करुन त्यास मा . न्यायालयासमोर हजर केले असता त्याची मा . न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि प्रविण दातरे हे करित आहेत . सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री . अखिलेशकुमार सिंग , अपर पोलीस अधीक्षक डॉ . दिपाली काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . सोमनाथ वाघचौरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले , सहा . पोलीस निरीक्षक मिथुन घुगे , सहा . पोलीस निरीक्षक प्रविण दातरे परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते , पोना / १२४६ पी . डी . अंधारे , पोना / १७६८ बी . वाय . सातपुते , पोना / २१८६ गणेश सोनवणे , पोना संदिप गडाख , चालक पोना / १२७३ बी . एस . वपे , चालक पोका / १८०३ डी . आर . गांगुडे , पोशि गजानन गायकवाड , पोशि / फिरोज पटेल , पोशि / सचिन पगारे मपोकॉ / १९३१ एस . आर . भारमल यांचेसह पथकाने केली आहे . ‘

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button