Amalner

Amalner: निरांकर सेवा पीठ भात गिरणी कामगार महासंघाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी भूषण पाटील यांची निवड

Amalner: निरांकर सेवा पीठ भात गिरणी कामगार महासंघाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी भूषण पाटील यांची निवड

अमळनेर येथील निरंकर सेवा पीठ, मसाला, भात गिरणी कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर झाली करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्षपदी भूषण उत्तमराव पाटील तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मल्हारराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारणी घोषित करण्यात आली. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी वीज वितरण कंपनीचे उप अभियंता यांची भेट घेणार आहेत.
नवीन कार्यकारिणी….
सचिव- देवेंद्र सुतार, संघप्रमुख- रविंद्र पाटील, सल्लागार – शे. सरफराज पठाण, कोषाध्यक्ष-शालिग्राव पाटील, संघटक- प्रमोद महाजन, सहसचिव राजेंद्र कुंभार, सहसंपर्क प्रमुख- कमलाकर पाटील, संघटक-संदीप पाटील, कार्याध्यक्ष – देविदास पाटील, सल्लागार-ज्ञानेश्वर पाटील, दिनेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button