Delhi

?️ Big Breaking.. सावधान..!मध खाताय..!पतंजली सह डाबर आणि इतर कंपन्यांच्या मधात साखरेची भेसळ..!CSE चा मोठा खुलासा..

?️ Big Breaking.. सावधान..!मध खाताय..!पतंजली सह डाबर आणि इतर कंपन्यांच्या मधात साखरेची भेसळ..!CSE चा मोठा खुलासा..

नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट (सीएसई)च्या संशोधन केंद्राने पतंजली, डाबर, वैद्यनाथ, झंडू, हितकारी व एपिस हिमालय या कंपन्यांच्या मध तपासणी केली असता त्यात भेसळ असल्याचा अहवाल सादर केला आहे.सामान्य जनतेत लोकप्रिय भारतीय ब्रँडच्या मधामध्ये अधिक “गोडवा” आणण्यासाठी अधिक “साखरेचा” उपयोग केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

सीएसईने भारतातील मधाची शुद्धता तपासणीसाठी १३ छोट्या-मोठ्या ब्रँडची निवड केली.ही प्रक्रिया कच्चे मध आणि प्रक्रिया केलेले मध यात तपासणी करून तपासण्यात आली आणि अत्यन्त धक्कादायक निष्कर्ष हाती आला आहे. मधाच्या या शुद्धता तपासणीत ७७ टक्के नमुन्यांमध्ये साखरेची भेसळ दिसून आली. तर २२ नमुन्यांपैकी ५ नमुने हे भेसळरहित आढळून आले आहेत.

डाबर, पतंजली, वैद्यनाथ, झंडू, हितकारी व एपिस हिमालय या ब्रँडचे मध ‘न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स’मध्ये भेसळयुक्त आढळून आले. जगभरात एनएमआर चाचणी मधातील भेसळ शोधण्यासाठी वापरली जाते. भारतात १३ ब्रँडपैकी सफोला, मार्कफेड ,सोहना व नेचर्स नेक्टर ह्या कंपन्या चे प्रॉडक्ट या चाचणीत उतीर्ण ठरले आहेत. ही चाचणी जर्मनीत करण्यात आली होती. त्यानंतर सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी हा अहवाल सादर केला.

मानवाच्या आरोग्यासाठी मध हे अत्यन्त गुणकारी आहे. विविध आरोग्य दायी गुण असलेले मध हे नैसर्गिक व शरीराला गुणकारी म्हणून भारतात खाल्ला जातो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत याचे सेवन केले जाते पण या मधात साखर आढळल्याने लठ्ठपणापासून ते गंभीर आजार होण्यापर्यंतची शेकडो उदाहरणे दिसत आहेत.

चीनमध्ये फळांपासून साखरयुक्त सीरप बनवले जाते ते मधात मिसळल्या नंतर मधाचा शुद्धपणा चाचणीत कळत नाहीत, याचा गैर फायदा या कंपन्या घेतात. २०१४-१५ या काळात चीनी कंपन्यांकडून हजारो टन फ्रॅक्टोज भारतात आयात करण्यात आले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.भेसळयुक्त मध खाल्यास त्याचा परिणाम केवळ मानवी प्रकृतीवर नव्हे तर शेती उत्पादकतेवरही होऊ शकतो, अशी भीती सीएसईने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.

दरम्यान सीएसईच्या अहवालावर डाबर कंपनीची प्रतिक्रिया आली आहे त्यांच्या मते कंपनीवर झालेले आरोप कंपनीची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. आमची कंपनी सर्व २२ मापदंडांचे पालन करत आली आहे. आमच्याकडे एनएमआर यंत्रणा आहे आणि आमचा मध १०० टक्के शुद्ध आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनीही हा अहवाल कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button