Maharashtra

मुळापाटबंधारेच्या पाथर्डी चारीला पाटाचे पाणी सोडावे

मुळापाटबंधारेच्या पाथर्डी चारीला पाटाचे पाणी सोडावे ,शेतकऱ्यांची मागणी
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुळापाटबंधारे विभागाच्या पाथर्डी चारीला २२मार्च पासुन आवर्तन सुरु आहे. पाटबंधारे विभागाच्या गलथान

प्रतिनिधी सुनिल नजन

कारभारामुळे आठ दिवसांत टेलपर्यंत पाणी न जाताच हेडकडच्या शेतकऱ्यांनी फोडून घेऊन टेलच्या शेतकऱ्यावर अंन्याय केला. जवखेडे, कासारपिंपळगाव, हनुमान टाकळी,चितळी, पाडळी,साकेगाव, सुसरे,आमरापुर, आव्हाने, भगुर,या गावातील शेतकऱ्यांना पाटाचे पाणी मिळावे म्हणून क्रुषीमित्र संदिप राजळे मित्रमंडळानी माजी आमदार चंद्रशेखर घुले

ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्याकडे फोनवर तक्रार केली.त्यांनी अहमदनगर येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना पिकांची पाहणी करण्यासाठी कासारपिंपळगाव येथे पाठवले.कार्य कारी अभियंता देशमुख साहेब यांचा लवाजमा फौज फाटयासह कासारपिंपळगावा तील मुख्य चौकात येताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सर्व कार्यकर्त्यासह कार्य कारी अभियंता किरण देशमुख साहेब यांना कासारपिंपळगावा तील मुख्य चौकात घेराव घातला व आमचे हक्काचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली.

मग कोरोणा आजारा संबंधीच्या सरकारी नियमांचे पालन करीत माजी जि.प.सदस्य शिवशंकर राजळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले .या बैठकिस भापकर साहेब,संदिप राजळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत,अर्जुन दादा राजळे,अरविंद भगत,राजेंद्र अप्पासाहेब राजळे,बाळासाहेब राजळे,ताराचंद राजळे, पाटकरी ठाणगे ,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ योगिताताई राजळे,यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा
[08/04, 18:45] Sunil Njan: बाईटःः शिवशंकर राजळे,अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button