Maharashtra

फैजपूर तलाठी कार्यलय परिसरात लावण्यात आलेली विविध झाडें कोरडी होऊ नये

फैजपूर तलाठी कार्यलय परिसरात लावण्यात आलेली विविध झाडें कोरडी होऊ नये यासाठी भर उन्हाळ्यात पाणी देउन जगवण्याचे कार्य कोरोना महामारीत केले जात आहे.

प्रतिनिधी सलीम पिंजारी

फैजपूर व परिसर विभागाचे मंडळाधिकारी जे बी बंगाळे यांनी फैजपूर तलाठी कार्यालय परिसरात मागील वर्षी जून महिन्यात लोकवर्गणी तुन जागेला कंपाऊंड व 20 ते 25 वड, लिंब, अशोक वृक्ष, बेल, बदाम, निलगिरी, लाल पारिजातीक फुल अशी वेगवेगळी झाडे लावून परिसर सुशोभित केला.

त्यामुळं परिसरात ऊर्जा निर्माण झाली. झाडांना माती टाकली, विटांचे कुंपण केले नेहमी पाणी टाकून झाडें जगवली आहेत. सध्या कोरोना महामारी मुळे सर्वत्र बंद आहे. सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने शनिवार रविवार कार्यालय बंद असते वरिष्ठांचा आदेश व महत्वाचे काम असेल तर शनिवारी सुद्धा यावे लागते यातच ही लावलेली झाले उन्हाळ्यात कोरडी होऊ नये जगली पाहिजे यासाठी कार्यलय परिसरातील अत्यन्त जुने पाण्याचे टँकर भरून आणून नळी द्वारे सर्व वृक्षांना जगवण्याचे कार्य मंडलाधिकारी जे बी बंगाळे, तलाठी प्रशांत जावळे, कोतवाल तुषार जाधव, संजय राजपूत, बंडू तायडे करीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ही वृक्ष हिरवीगार दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button