सुरगणा

सुरगाणा तालुक्यात चोरीचा धुमाकूळ; पोलिसांचा धाक कमी होतोय

सुरगाणा तालुक्यात चोरीचा धुमाकूळ; पोलिसांचा धाक कमी होतोय

सुरगाणा तालुक्यात चोरीचा धुमाकूळ; पोलिसांचा धाक कमी होतोय

सुरगाणा प्रतिनिधी दीपक भोये
           येथे झालेल्या काही चोरींपैकी एका चोरीचा तपास करण्यात सुरगाणा पोलिसांना यश आले असले तरी येथे पुन्हा चोरी झाल्याने आता हा चोर नक्की कोण असावा याविषयी कुतूहल व संताप देखील व्यक्त केला जात आहे. उंबरठाण रस्त्यावरील प्रकाश जाधव यांचे फर्निचरचे दुकान असुन आज सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊच्या दरम्यान दुकान उघडले असता त्यांना दुकानातील कपाट उघडलेले व पत्रा वाकवून लाॅकरमध्ये व्यापारींना देण्यासाठी ठेवलेले सत्तर हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबविल्याचे लक्षात आले. दुकानाच्या मागील बाजूने चोरट्याने आत प्रवेश केला असावा असा कयास आहे. याबाबत जाधव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पूढील तपास सुरू आहे. यामुळे शहरातील सर्व व्यापारी वर्ग व सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असुन या चोरीचा कायमस्वरूपी निपटारा करण्यात यावे, अशी मागणी सर्व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button