सुरगणा

पत्रकार इम्रान शहा यांच्या सहकार्य मुळे अपंगांना मिळाली सायकल हाक मारा साथ देऊ असे आव्हान केले

पत्रकार इम्रान शहा यांच्या सहकार्य मुळे अपंगांना मिळाली सायकल
हाक मारा साथ देऊ असे आव्हान केले

तुम्हाला वाटत असेल की मी अपंग निराधार असे लोकांची मदत का करतो …..

विजय कानडे

मी स्वताची स्तुती साठी,पैसे मिळवण्यासाठी,व नाव कमवण्यासाठी नाही करत याचा मागचा सत्य तर हे आहे की माझ्या घरात माझा सक्का लहान भाऊ ज्याचा वय २० आहे डोळ्याने अंध,मुख बधिर,ऐकू येत नाही ,तसेच हृदयाचा त्रास जो पर्यंत सेवा होईल तो पर्यंत …अश्या व्यक्तीची सेवा आम्ही आमच्या घरात करतो ,म्हणुन मला असे वाटते की प्रत्येक व अपंग निराधार व्यक्तीची सेवा आपण करायला पाहिजे कारण या गोष्टीला चांगलेच प्रकारे आम्ही जानतो.
विशेष म्हणजे माझ्या भावाचा जन्म नोंद मिळत नाही,आधार कार्ड नाही या मुळे आम्हाला अपंग दाखला काढण्यात त्रास होतोय,तरी असू द्या हे परमेश्वराने दिलेले प्रसादच म्हटले जाईल , अनेक लोक हसतात त्यांना वाटत काही करतो,काही लोकांना वाटत पैसे खाण्यासाठी ,माझ्या भावाला महिन्याला १०,००० रुपये दवाखान्यात लागता आम्ही स्वताचा हिमतीवर करतो कोणाकडे कोणतीही मदत न घेता कारण परमेश्वर त्याचा नशिबानेच देत असेल
त्याचात कलागुण हे आहे स्वता तो अंघोळीला पाणी ठेवतो,त्याला वाटलं तेव्हा चहा,साबुदाणा खिचडी बनवतो,देवाऱ्यात रोज खुर्चीवर उभाराहून देव बत्ती करतो,नमाज पठण करतो, आणि स्वताचा भाषेत परमेश्वराकडे दुवा करतो की मला नेत्र नाही,बोलू शकत नाही,ऐकू येत नाही ह्रदयाचा धडपन जास्त तरी तू मला जीव दिला व मला आयुष्य दे स्वताचा भाषेत देवाशी भांडत असतो ,माझ्या घरी येऊन बघा त्याची परस्थिती तर कळेल ,आमच्या घरात सगळ्यात लाडका आहे आम्ही त्याचा लाडही करतो
म्हणून अनाथ निराधार लोकांची मदत करणं मला आवाडते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button