Maharashtra

२०वी राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी ओम बोरसे,सोहम,भाविका, वेदिका,लावण्या यांची निवड

२०वी राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी ओम बोरसे,सोहम,भाविका, वेदिका,लावण्या यांची निवड

२०वी राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी ओम बोरसे,सोहम,भाविका, वेदिका,लावण्या यांची निवड

  २४ व २५ ऑगस्ट२०१९ रोजी पुणे येथे आयोजित २०वी राज्यस्तरीय ज्युनिअर रोप स्किपिंग स्पर्धेत  ३० सेकंद व ३ मिनिट स्किपिंग प्रकारात जळगाव जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशन, जळगांव संघ विजेता झाला. त्या संघातील विजेत्या खेळाडूंची २१ ते २३ सप्टेंबर २०१९ रोजी शिर्डी येथे आयोजित २०वी राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
चि.ओम सुशिल बोरसे ( चावरा इंग्लिश स्कूल, धुळे), चि.सोहम बोरसे (ललिता पाटील इंग्लिश स्कूल, अमळनेर ), कु .भाविका बोरसे ( ललिता पाटील  इंग्लिश स्कूल अमळनेर  ), कु.वेदीका बोरसे ( सानेगुरुजी विद्या मंदिर अमळनेर ) 
 राष्ट्रीय स्पर्धत निवड झाल्याबद्दल जळगाव रोप स्किपिंग अध्यक्षा सौ.प्रेरणा सुशिल बोरसे, उपाध्यक्ष सुशिल बोरसे, गोविंद बोरसे यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button