Faijpur

फैजपुर नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीत एससीच्या दोन जागा आरक्षित ठेवाव्यात

फैजपुर नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीत एससीच्या दोन जागा आरक्षित ठेवाव्यात

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

फैजपुर नगर परिषदेच्या येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत एससी जातीला दोन जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात अशी मागणी असून फैजपूर शहरात मतदार संख्या वाढली असून एक प्रभाग वाढविण्यात आलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत 19 नगरसेवक ऐवजी आता 21 नगरसेवक निवडून येणार आहे त्यामुळे एसटी जातीच्या एक जागे एवजी दोन एसटी च्या जागा यावेळेस प्रथमच निवडून येणार आहे त्यापाठोपाठ एससी जातीला सुद्धा दोन जागा आरक्षित ठेवाव्यात अशी मागणी अशोक भालेराव यांनी केली असून त्यांनी पुढे म्हटले आहे की रावेर यावल सावदा या ठिकाणी यावेळेस दोन एससी च्या जागा राखीव ठेवण्यात आलेले आहे रावेर फैजपूर सावदा यावल यापेक्षा जास्त एससी मतदारांची संख्या फैजपूर शहरात जास्त असून या ठिकाणी पालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे फैजपूर नगरपरिषदेची वार्ड रचना आणि आरक्षण अंतिम टप्प्यात असून जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस न्याय विभागाचे शहराध्यक्ष अशोक भालेराव यांनी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button