पंढरपूर

फिर एक बार ‘रमेश कदम’ आमदार

फिर एक बार ‘रमेश कदम’ आमदार

रफिक अतार

पंढरपुर- (प्रतिनिधी)- 2019 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मोहोळ विधानसभा हा मतदारसंघ राखीव पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत आला आहे. 2014 च्या अभूतपूर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार रमेश कदम हे विजयी झाले. आपल्या मोहोळ तालुक्यातील मुख्य समस्या म्हणजे पाणी प्रश्न या पाणी समस्या वर आमदार रमेश कदम यांनी संपूर्ण मूळ तालुक्यांमध्ये भर उन्हामध्ये मागेल त्याला पाणी, फक्त एक फोन करा पाणी गावात वाडीवस्तीवर मुबलक पाणी आणि एका फोनवर पाणी देण्याचे काम आमदार रमेश कदम यांनी केले. जे आजपर्यंत कोणाला जमले नाही असे पाणी वाटपाचे काम रमेश कदम यांनी केल्यामुळे त्यांना पाणीदार आमदार म्हणून मोहोळ तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील जनता ओळखू लागली. काही खटले दाखल झाल्यामुळे रमेश कदम या मतदारसंघात विकासापासून आणि पाण्याच्या समस्या पासून दुर्देवाने दूर राहिले रमेश कदम हे आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. मोहोळ मतदार संघातील युवा कार्यकर्ता तसेच जनताही आपण स्वतःहून निवडणुकीमध्ये राहिलो आहे. असे समजून हे रमेश कदम प्रेमी युवक आणि जनता आज प्रकारांमध्ये चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा पाहिजे त्याला पाणी मिळवून देण्याऱ्या या पाणीदार आमदार निवडून देण्याची चर्चा सध्या मोहोळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button