Maharashtra

? आरोग्याचा मुलमंत्र दमा (Asthma) लक्षणे, प्रकार व घ्यायची काळजी

? आरोग्याचा मुलमंत्र

दमा (Asthma)
लक्षणे, प्रकार व घ्यायची काळजी

दमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे.
ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो.
हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो.
दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो.
ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.
त्याला सूज येऊन तो आकुंचन पावला की व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो.

जेव्हा ही सूज खूप वाढते तेव्हा श्वासनलिका खूपच आकुंचन पावून श्वासाच्या त्रासाबरोबरच खोकला, घसा खवखवणे आणि छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसून येतात.
खोकल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कफ होतो पण तो कफ पडून जाणे कठीण होऊन बसते.
ह्या रोगावर वरवरचे उपाय करून चालत नाही तर हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी उपचार करावे लागतात.
नाहीतर तेवढ्यापुरते बरे वाटून पुन्हापुन्हा हा आजार उद्भवतो.

दम्याचे प्रकार

१) पेरिनियल अस्थमा (Perennial Asthma)
२) सिजनल अस्थमा (Seasonal Asthma)
३) एलर्जिक अस्थमा (Allergic Asthma)
४) नॉन एलर्जिक अस्थमा (Non Allergic Asthma)
५) अकुपेशनल अस्थमा (Occupational Asthma)

दम्याची लक्षणे

श्वास घेताना त्रास होणे हे दम्याचे प्रमुख लक्षण आहे.
ह्याशिवाय खाली आणखी काही लक्षणे दिली आहेत जी जाणून घेऊन आपण त्यावर घरगुती उपायांनी मात करू शकतो.
१) वारंवार खोकला येणे
२) श्वास घेताना आवाज येणे
३) छातीवर दडपण येणे
४) दम लागणे
५) कफ होणे व तो मोकळा न होणे
६) घसा कोरडा पडणे
७) बेचैन वाटणे

दम्यावरील घरगुती उपाय

दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने खालील गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे.
१) हिवाळा आणि पावसाळा ह्या ऋतूंमध्ये विशेष काळजी घेणे.
२) धुळीपासून स्वत:चे रक्षण करणे
३) घराबाहेर जाताना मास्क वापरणे
४) नवीन रंग, उदबत्ती, किटकनाशके ह्यांच्या वासापासून स्वतःला दूर ठेवणे
५) हिवाळ्यात धुक्यापासून स्वतःचे संरक्षण करणे
६) धूम्रपान करणाऱ्या व्यक्ति पासून दूर राहणे
आहारात खालील गोष्टींचा नक्की समावेश करा
१) गहू
२) जूने तांदूळ
३) अख्खे मूग व मुगाची डाळ
४) कुळीथ
५) जवस
६) हिरव्या पालेभाज्या
७) लसूण,आलं, काळीमिरी आणि हळद
८) मध
पालक आणि गाजराचा रस दम्याच्या रुग्णांना फार उपयोगी आहे.
तसेच कोमट पाण्याचे सेवन करणे आणि ढास लागत असल्यास मध घेणे गुणकारी ठरते.
दम्याच्या रुग्णांनी काही पथ्ये पाळणे देखील आवश्यक आहे.
आहारात मासे मुळीच घेऊ नका. तसेच शिळे अन्न आणि तळलेले पदार्थ टाळा .
गोड पदार्थ, दही टाळा तसेच फार गार पाणी पिऊ नका.
कोल्ड ड्रिंक्स, थंड पाणी तसेच इतर थंड पदार्थ आहारात घेऊ नका.
अंडी, मास व मासे यांचे कमीतकमी सेवन करा.
नियमित पणे प्राणायाम व सूर्यनमस्कार करण्याचा दम्याच्या रुग्णांना खूप उपयोग होतो.
तसेच योगासने करण्याचा ही खूप फायदा होतो. पण फार थकवणारे दम लागेल असे व्यायामप्रकार करू नयेत.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button