Kolhapur

नवीन योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समरजितसिंह हेच सक्षम पर्याय : नवोदिता घाटगे

नवीन योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समरजितसिंह हेच सक्षम पर्याय : नवोदिता घाटगे

सुभाष भोसले,कोल्हापूर
प्रत्येक नवीन योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समरजितसिंह हेच कागल गडहिंगलज ,उत्तुरसाठी सक्षम पर्यायआहेत असे प्रतिपादन सौ नवोदीता घाटगे यांनी केले.बेळगुंदी, करंबळी,जखेवाडी,येथील प्रचार दौऱ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी नवोदिता घाटगे म्हणाल्या अपंग, निराधार, शेतकरी ,कष्टकरी व युवावर्ग यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच
योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समरजितसिंह घाटगे अहो रात्र झटत आहेत.जनतेचा,जेष्टांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.त्यासाठी कपबशीला मतदान करून साथ द्या. जनतेची सेवा करण्याचे भाग्य आमच्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेले आहे. त्याचा वसा आणि वारसा जपण्याचे काम आम्ही कुटुंबीय करत आहोत.कागल विधानसभा मतदारसंघातील गावे ,वस्त्या ,खेडी यांच्या विकासासाठी समरजितसिंह घाटगे यांना साथ द्या.असे आवाहन नवोदिता घाटगे यांनी केले. यावेळी बोलताना पांडुरंग जाधव म्हणाले,राजेंच्या बद्दल प्रेम आहे.जनता त्यांच्या पाठीशी आहे.जनतेतून उठाव झाला आहे.जनतेलाच परिवर्तन हवे आहे.हा भाग दुर्लक्षित आहे.रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समरजित घाटगे प्रयत्नशील आहेत.ही जनतेची निवडणूक आहे.जनतेलाच बदल अपेक्षित आहे.या निवडणुकीत करंबळीतून उच्चाकी मतदान कपबशीला देवू.
यावेळी या भागातील विविध संस्थाचे पदाधिकारी महिला मोठ्या‌ संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button