Delhi

?आताची मोठी बातमी..मी पण आता राजकारणात प्रवेश करणार.. रॉबर्ट वाड्रा यांची मोठी घोषणा..!

?आताची मोठी बातमी..मी पण आता राजकारणात प्रवेश करणार.. रॉबर्ट वाड्रा यांची मोठी घोषणा..!

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर आता रॉबर्ट वाड्रादेखील राजकारणात येणार का असा सवाल अनेक दिवसांपासून चर्चिला जात होता. मात्र आता यावर वाड्रा यांनी स्पष्टीकरण देत मोठी घोषणा केली आहे. वाड्रा यांनी जयपूरच्या प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेनामी संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची यापूर्वी चौकशी केली होती.
सरकारी एजन्सींचा चुकीचा वापर होत असून प्रत्येक वेळी आपल्याला लक्ष्य केलं जातं असा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. जयपूरमध्ये गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतरही त्यांनी या मुद्यावर मत व्यक्त केले. ‘ईडीला जितके प्रश्न विचारयाचे आहेत, त्यावर मी उत्तर देईल. मला आता पुन्हा चौकशीला बोलवण्याचं काहीही कारण नाही. गेल्या 25 वर्षात आपण राजकारणातील प्रवेशाबाबत कधीही विचार केला नव्हता. मात्र मी आता राजकारणात येणार आहे.’ असे वाड्रा यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाड्रा यांच्या या घोषणेनंतर सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर गांधी घराण्याशी थेट संबंध असलेली चौथी व्यक्ती आता लवकरच राजकारणात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेशमधील हिंदू महासभेचे माजी नेते आणि नथुराम गोडसे यांचा पुतळा बसवण्यात सक्रीय असलेल्या बाबूलाल चौरासिया यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर, ‘मला या विषयाची माहिती नाही, पण मी असतो तर गोडसेची पूजा करणाऱ्या व्यक्तीला मी राजकारणापासून दूर ठेवलं असतं,’असे वाड्रा यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button