पंढरपूर

स्वेरीज् फार्मसीकडून तावशीमध्ये संस्कार शिबीराचे आयोजन

स्वेरीज् फार्मसीकडून तावशीमध्ये संस्कार शिबीराचे आयोजन

दि.२३ डिसेंबर पर्यंत चालणार शिबीर

पंढरपूर प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या सयुंक्त विद्यमाने मंगळवार (दि.१७ डिसेंबर) पासून तावशी (ता. पंढरपुर) मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष परिश्रम, ग्रामस्थांना शैक्षणिक प्रबोधन, ग्राम स्वच्छतेचे महत्व, मुली वाचवा देश वाचवा, वृक्षारोपण, पाणी वाचवा, शिक्षणाचे महत्व व संबंधित मार्गदर्शन असे अनेक विविध विषयांवर प्रबोधनपर व संस्कारत्मक स्वरुपांच्या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती स्वेरीच्या फार्मसीचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मिथून मणियार यांनी दिली.
ही राष्ट्रीय सेवा योजना मोहिम दि. २३ डिसेंबरपर्यंत म्हणजे आठवडाभर चालणार आहे. या शिबिरात दररोज सकाळी ९ पासून स्वच्छता, श्रमदान, ग्रामसर्वेक्षण,औषध वापरा विषयी जनजागृती, महिलांचे आरोग्य व आजार यातील तज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता व माती परीक्षण विषयक विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि.२३ रोजी या शिबिराचा समारोप होणार आहे. त्याचे उदघाटन नुकतेच तावशीच्या सरपंच सौ.सोनाली यादव यांच्या हस्ते झाले तर यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक अॅड. तानाजी सरदार, गावातील जेष्ट नागरिक व विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सरकार यादव, भुजंग यादव, ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील, साधना विद्यालयाचे सचिव बाळू काका यादव, उपसरपंच अल्लाभाई मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य धनाजी यादव, पोलीस पाटील कबीर आसबे, पत्रकार पांडुरंग सूर्यवंशी, मिलिंद यादव, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार व फ़ार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांच्या सहकार्याने तसेच फार्मसीचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मिथून मणियार नेतृत्वाखाली, प्रा.प्रदीप जाधव, प्रा.एम.एस. होळकर, प्रा.डी. आर. वाघ व रासेयो कार्यक्रम विद्यार्थी सचिव स्वप्निल राऊत, कार्यक्रम समन्वयक संदीप यादव, युवराज पवार, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी ग्रामस्त सहकार्य करत आहेत.
छायाचित्र- तावशी (ता. पंढरपुर) मध्ये स्वेरीज् फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उदघाटन करताना तावशीच्या सरपंच सौ.सोनाली यादव सोबत ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील, स्वेरीच्या फार्मसीचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मिथून मणियार, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व इतर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button