Maharashtra

नंदुरबार येथे जीवनावश्यक कीटचे वाटप

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार येथे जीवनावश्यक कीटचे वाटप

नंदुरबार दि.3- रोटरी आय हॉस्पिटल आणि अहिंसा इंटरनॅशन स्कूल नंदुरबार यांच्याकडून प्राप्त झालेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या 550 कीटचे वाटप आमदार विजयकुमार गावीत आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी बाबूराव बिक्कड, राजेश मुनोत, सौरभ मुनोत, डॉ.सुहास फुलंब्रीकर, डॉ.मुकुंद सोहनी, डॉ.रोशन भंडारी, राजेश जैन आदी उपस्थित होते.

नंदुरबार येथे जीवनावश्यक कीटचे वाटप

प्रत्येक कीटमध्ये 5 किलो पीठ, 2 किलो तांदूळ, मीठ, मसाला, चहा, साखर आदी जीवनावश्यक वस्तू आहेत. गरजूंचे सर्वेक्षण तालुका प्रशासनाने केले होते. त्यानुसार त्यांना 8 ते 10 दिवस पुरेल इतके साहित्य वितरीत करण्यात आले.
शहरात प्रशासन आणि 16 स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने दररोज 200 व्यक्तींना मोफत भोजन देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कोविड-19 सारख्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून गरजूंना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही याची दक्षता प्रशासन घेत असल्याचे यावेळी डॉ.भारुड यांनी बोलताना सांगितले. त्यांनी सहकार्य करणाऱ्या संस्थांना धन्यवाद दिले. गरजूंना मोफत किरणा तसेच माफक दरात भाजीपाला पुरविण्यासाठी अनेक संस्था पुढे येत असून आवश्यक गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी इच्छुक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

——-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button